• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य

राशीभविष्य २१ ते २७ नोव्हेंबर २०२६

Marmik Team by Marmik Team
November 20, 2026
in भविष्यवाणी
0

ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्वेâत, गुरू केतू सिंहेत, शुक्र कन्येत, रवि, बुध तूळ राशीत, प्लूटो मकरेत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत. दिनविशेष : २१ नोव्हें. भागवत एकादशी, २२ नोव्हें. प्रदोष, २३ नोव्हें. वैकुंठ चतुर्दशी, २४ नोव्हें. गुरुनानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, २७ नोव्हें. संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रा. ८ वा. ४८ मि.

 

मेष : ज्येष्ठांचे बोलणे सल्ला म्हणून ऐका. नोकरी, व्यवसायात, प्रेमप्रकरणात गैरसमज टाळा. तडजोड स्वीकारा. पत्नीशी, मित्रांशी वाद टाळा. तरुणांना शिक्षणाच्या, नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. व्यवसायात घाईने घेतलेला निर्णय धोकादायक ठरतील. प्रश्न मार्गी लागतील, पण, गुप्तता बाळगा. स्वभावाला मुरड घाला. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. महिलांना यशदायी काळ.


वृषभ :
शिक्षण, व्यवसाय, नोकरीत यशासाठी कष्ट घ्या. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोके वर काढतील. नोकरी-व्यवसायात कामाचा ताण व स्पर्धा वाढेल. सामाजिक कार्याचा गौरव होईल. व्यवसायात यश खेचून आणाल. काही ठिकाणी दुर्लक्ष करून पुढे जा. कलाकार, लेखकांना पुरस्कार लाभेल. कोणालाही आश्वासन देऊ नका. विचारवंत, पत्रकारांसाठी चांगला काळ.


मिथुन :
सकारात्मक राहा, नोकरी, व्यवसायात सबुरीने घ्या. कामात घाई नको. तरुणांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. महिलांची जबाबदारी वाढेल. खेळाडूंना यशासाठी अधिक झटावे लागेल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. भावंडांना मदत करावी लागेल. व्यवसायात यश मिळेल. नवीन ऑर्डर मिळतील, नियोजनात चुका टाळा. नोकरीत अति आत्मविश्वास नको. वाहन चालवताना घाई नको.

कर्क : कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. तरुणांना संयम कामी येईल. नोकरीत वरिष्ठांची नाराजी टाळा. घरात मतभेद टाळा. तरुणांना यश मिळेल. उच्चशिक्षणाचा प्रश्न सुटेल. परदेशी जाल. गुंतवणुकीच्या योजनांत अडकू नका. भावंडांची मदत मिळेल.आर्थिक गणित बिघडेल. नातेवाईक, मित्र, शेजार्‍यांशी वाद टाळा.


सिंह :
कामाच्या रगाड्यात आरोग्याची ओढाताण होईल. भान ठेवून काम करा. तरुणांमध्ये धाडसी वृत्ती पुढे येईल. व्यवसायात आर्थिक पारदर्शकता ठेवा. नव्या संकल्पनांमधून व्यवसाय उभा राहील. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. भागीदारीत वाद टाळा. चांगल्या कामात वेळ खर्च करा. कायदेशीर गोष्टी हलक्यात घेऊ नका. मौजमजेवर खर्च टाळा.

कन्या : तरुणांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्याचे कौतुक होईल. शिक्षकांना नव्या संधी येतील. व्यवसायात आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत वरिष्ठ खूष होतील. व्यवसायात वेळेचे नियोजन करा. कोणाला आर्थिक सल्ले देऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नशिबाची साथ मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.

तूळ : व्यवसायात नियोजनाला महत्व द्या. अनोळखी व्यक्तीवर विश्वसून निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाशी काम ठेवा. कामाचा ताण वाढेल. अचानक प्रवास करावा लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. तरुणांनी आळस दूर ठेवावा. रागावर नियंत्रण ठेवा. नव्या ओळखी फायदेशीर ठरतील. संशोधकांना यशदायी काळ. कुटुंबात वाद घडतील. विदेशात जाण्याचे योग जुळून येतील.

वृश्चिक : बँकेच्या कामांत काळजी घ्या. घरात वाद टाळा. कलाकार, संगीतकारांना नव्या संधी मिळतील. महिलांनी संयम ठेवावा. जुनी गुंतवणूक चांगला लाभ देईल, विनियोग जपून करा. घरात मोठा निर्णय घेताना भावनिकता टाळा. तरुणांनी जपून बोलावे.लॉटरी, सट्ट्यापासून दूर राहा. नातेवाईकांना मदत करावी लागेल. सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका.

धनु : नोकरी, व्यवसायात सामोपचाराने घ्या. व्यवसायात नवीन ऑर्डरमुळे आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल. कलाकार, शिक्षकांसाठी चांगला काळ. तरुणांना नव्या संकल्पनांमधून उत्पन्न मिळेल. नोकरीत कागदपत्रे तपासूनच सही करा. जुने मित्र भेटतील. मौजमजा कराल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दाम्पत्यजीवनात आनंद मिळेल. आरोग्याच्या तक्रारी वाढवतील.

मकर : कामात आरोग्याकडेही लक्ष द्या. राग व्यक्त करू नका. व्यवसायाचा विदेशात विस्तार करू शकाल. कौटुंबिक सहलीला जाल. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात धाडस दाखवा. घरासाठी वेळ खर्च होईल. संयमाने अडकलेली कामे मोकळी होतील. शेअर ब्रोकर, इस्टेट एजंट, खेळाडू यांना लाभदायक काळ. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

कुंभ : कामाचा कंटाळा येईल. मनोरंजनाकडे कल राहील. सरकारी कामात नियम पाळा. घाई टाळा. वाहन चालवताना गोंधळ घालू नका, अपघाताला निमंत्रण मिळेल. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे संकेत आहेत. विदेशात व्यवसाय वाढवाल. भागीदारीत सबुरीने घ्या. पत्नीच्या साथीने काम मार्गी लागेल. जोश वाढेल. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा. कलाकार, गायक, संगीतकारांसाठी चांगला काळ.

मीन : शांत आणि संयमी राहा. तरुणांना यशदायी काळ. व्यवसायात आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. मुलांकडून सुवार्ता कळतील. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. अवघड निर्णय लांबणीवर टाका. महिलांनी आरोग्य सांभाळावे. व्यवसायात काळजीपूर्वक पावले टाका. घरात वाद टाळा. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला. सामाजिक क्षेत्रात नवा उपक्रम सुरू कराल. इंजीनियरिंग, मेडिकल क्षेत्रात चांगला काळ.

Previous Post

मार्मिक दिवाळी अंक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.