ग्रहस्थिती : रवि, शुक्र मेषेत, हर्षल वृषभेत, गुरु मिथुनेत, मंगळ, बुध, शनि, नेपच्युन मीनेत, केतु सिंहेत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत. दिनविशेष : ५ मे कालाष्टमी, १३ मे अपरा एकादशी, १४ मे प्रदोष, १५ मे शिवरात्री.

मेष : नोकरीत वाद टाळा. व्यवसायात कष्ट पडतील. कौटुंबिक सहलीचे आयोजन होईल. मित्रांमुळे अडचणीत याल. तरुणांची चिंता वाढेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. सल्ला घेतल्याखेरीज पुढे जाणे टाळा. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. आमदनी पाहून खर्च करा. राग आवरा. घरातील वातावरण आनंदी राहील. आठवड्याअखेरीस संततीकडून चांगली बातमी कळेल. मनःस्वास्थ चांगले राहील. नातेवाईकांबरोबर जुने वाद संपुष्टात येतील. भागीदारीत अनपेक्षित बदल स्वीकारा. बँकेत व्यवहार करताना काळजी घ्या. फसवी आश्वासने घात करतील.

वृषभ : कामात वाढीव कष्ट पडतील. व्यवसायात अनपेक्षित बातमी मिळेल. घरात खूप वेळ खर्च होईल. आर्थिक गणित बिघडेल. आमदनी आणि खर्चाची योग्य सांगड घाला. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ. सरकारी कामे पुढे जातील. अचानक प्रवास घडेल. तरुणांना नव्या नोकरीची संधी मिळेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. मालमत्तेच्या व्यवहारात कागदपत्रे तपासा. सकारात्मक दृष्टिकोनाचा फायदा होईल. डोळे झाकून कोणत्याही कागदावर सही करू नका. सामाजिक कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळेल.

मिथुन : नव्या मैत्रीमुळे कामे हलकी होतील. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. नव्या वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांना समाजकार्यात यश मिळेल. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागले. मुलांचे प्रश्न सोडवण्यात यश मिळेल. मित्रांची मदत मिळेल. घरात किरकोळ वाद वाढू देऊ नका. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. जनसंपर्क कर्मचारी, पत्रकार, लेखकांना नव्या संधी मिळतील. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.मित्र-मंडळींबरोबर पार्टी, मौजमजा कराल. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क : नोकरीत कामात बदल होतील. व्यवसायात प्रवास करावा लागेल. नवीन वाहन खरेदी कराल. आर्थिक गणित बिघडेल. घरात अहंकार बाजूला ठेवा. मित्रांशी जपून बोला. शेजार्यांशी जमवून घ्या. आठवड्याअखेरीस कामाचा कंटाळा येईल. नवीन वास्तू घेण्याचा विषय मार्गी लागेल. घरात आनंदसोहळा होईल. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची भेट होईल. गुंतवणुकीतून फायदे मिळतील. कलाकार, खेळाडू, संगीतकारांसाठी चांगला काळ. बोलताना काळजी घ्या. मान-अपमानात अडकू नका.

सिंह : प्रवासामुळे तब्येत बिघडेल. व्यवसायात कामाचे गणित बिघडेल. तरुणांमध्ये चैनीची वृत्ती वाढेल. मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. मालमत्तेच्या व्यवहारातून डोकेदुखी वाढेल. शिक्षक, संशोधकांचे कष्ट वाढतील. मन प्रसन्न ठेवा. मित्रांना मदत करताना काळजी घ्या. घरासाठी महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल. भागीदारीत व्यवहार करताना काळजी घ्या. समाजकार्यातून आनंद मिळेल. सकारात्मक विचार करा. अति आत्मविश्वास टाळा. ज्येष्ठांशी वाद टाळा. थकीत येणे वसूल होईल.

कन्या : व्यवसायात अधिक लक्ष द्या. नवीन योजना पुढे नेण्याचे टाळा. नोकरीत मनासारखी स्थिती निर्माण होणार नाही. भागीदारीत वाद टाळा. मित्रांना आर्थिक मदत करावी लागेल. कुटुंबात जमवून घ्या. वाहनांच्या दुरुस्तीवर पैसे खर्च होतील. काही ठिकाणी कल्पक योजना कामी येईल. जनसंपर्क क्षेत्रात नव्या संधी चालून येतील. नवीन मित्र होतील. नातेवाईक, मित्र यांची गाठभेट होईल. उधार-उसनवारी टाळा. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. नोकरीत बुद्धी कौशल्य वापरून पुढे जा.

तूळ : व्यवसायात यश मिळेल. मोठे निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. आर्थिक व्यवहारातून वाद घडतील. घरातील कामातून आनंद मिळेल. कुटुंबाबरोबर प्रवास कराल. तरुणांना कामाचे ओझे वाटून त्यातून चुका होतील. अहंकार दूर ठेवा. महिलांचा अपेक्षाभंग करणारी घटना घडू शकते. उधार उसनवारी टाळा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. सकारात्मक विचार करा. मुलांशी जमवून घ्या. मनावर दडपण घेऊ नका. मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होतील. दाम्पत्य जीवनात कुरबुरी घडतील. निर्णय घेताना घाई नको.

वृश्चिक : व्यवसायात फायदा होईल. भावंडांत वाद टाळा. मुलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. नोकरीत कौतुक होईल. मार्केटिंगमध्ये यश मिळेल. कुटुंबासाठी वेळ आणि पैसे खर्च करावे लागतील. नातेवाईकांशी जमवून घ्या. आर्थिक मदत करताना काळजी घ्या. सुटीकाळात मनासारखे पर्यटन घडेल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. मुलांकडे लक्ष द्या, डोकेदुखी वाढू शकते. शिक्षणक्षेत्रात चांगला काळ अनुभवाल. काम सरळमार्गी करावे. व्यवहार चोख ठेवा. नातेवाईक मदतीसाठी हात पुढे करतील.

धनु : व्यवसायात यश मिळेल. नोकरीत कामे पुढे नेण्यासाठी अधिक कष्ट पडतील. राग व्यक्त करणे टाळा. कोर्ट-कचेरीची कामे मागे पडतील. शिक्षणक्षेत्रात यशदायी देणारा काळ. घरात समारंभ होईल. आनंदवार्ता समजेल. मुलांकडून गोड बातमी समजेल. आर्थिक व्यवहारात खबरदारी घ्या. बँकेची कर्जप्रकरणे मार्गी लागतील. आरोग्याकडे अधिक लक्ष्ा द्या. महिला उदयोजकांना यश मिळेल. नवीन वास्तू घेण्याच्या विचाराला गती मिळेल. समाजसेवेसाठी वेळ खर्च होईल. समाधान वाढेल.

मकर : कामामुळे मनावरचे दडपण वाढेल. येणे वसूल होईल. आर्थिक नियोजनात योग्य काळजी घ्या. नोकरीत बदली होऊ शकते. रखडलेली कामे पुढे सरकतील. प्रवासाच्या नियोजनात काळजी घ्या. घरात गैरसमज निर्माण होतील. घरातील ज्येष्ठांबरोबर जमवून घ्या. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून रिटर्न मिळतील. महिलांना अपेक्षित यश मिळेल. व्यवहार करताना काळजी घ्या. जुन्या ओळखींमधून लाभ होईल. मोठी शुभवार्ता कळेल.

कुंभ : वाहन चालवताना वेगावर स्वार होऊ नका. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. उधारी करू नका. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. कामे पत्नीच्या मदतीने पुढे सरकतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. वेळ पाहून निर्णय घ्या. हातातली संधी जाऊ देऊ नका. तरुणांनी मनावर ताबा ठेवावा. जुने आजार डोके वर काढतील. व्यवसायात त्रास सहन करावा लागेल. खेळाडूंसाठी यशदायी काळ. चांगला विचार करा आणि पुढे चला. सामाजिक कार्यात मोठ्या व्यक्तीचा सहवास लाभू शकतो.

मीन : उष्णतेचे विकार त्रासदायक ठरतील. बहीण-भावाची मदत मिळेल. व्यवसायात मोठे निर्णय घेऊ नका. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. तुमचे कर्तृत्व सिद्ध करणार्या घटना घडतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. घरात वाद टाळा. नवीन गुंतवणूक करताना दक्षता घ्या. मुलांकडून चांगली बातमी कळेल. खेळाडूंना अपेक्षित यश मिळणार नाही. नव्या नोकरीची संधी येईल. अहंकार दूर ठेवा, म्हणजे मानसिक संतुलन ढळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. व्यवसायात शुभ घटना कानावर पडतील.

