ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, मंगळ मिथुनेत, रवि-बुध-गुरु कर्केत, प्लूटो मकरेत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, केतु सिंहेत, शुक्र कन्येत. दिनविशेष : ५ सप्टें. गोपाळकाला, ७ सप्टें. अजा एकादशी, ८ सप्टें. भीमप्रदोष, ९ सप्टें. शिवरात्री, १० सप्टें. दर्श पिठोरी अमावस्या, आरंभ स. १० वा. ३३ मि., ११ सप्टें. अमावस्या समाप्ती, स. ८ वा. ५६ मि.

मेष : अडकलेली कामे पुढे सरकतील. नोकरी-व्यवसायात समजूतदारपणा दाखवा. कुटुंबाबरोबर वाद घडतील. तुटेपर्यंत ताणू नका. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. व्यवसायात आर्थिक बाजू उत्तम राहील. तरुणांना करियरच्या नव्या वाटा सापडतील. प्रेमप्रकरणात वाद होतील. आठवड्याच्या मध्यास कामाचे वेळापत्रक विस्कळीत होईल. मुलांच्या वागण्याकडे विशेष लक्ष द्या. ब्रोकर म्हणून काम करणार्या मंडळींनी आर्थिक व्यवहारात सतर्क राहावे. जुने आजार डोकेदुखी वाढवतील. महिलांची अडकेलेली कामे मार्गी लागतील. मार्वेâटिंग क्षेत्रात यश मिळवून देणारा काळ.

वृषभ : जवळच्या व्यक्तीकडून चांगली मदत होईल. कुटुंबात गैरसमज टाळा. नोकरी-व्यवसायानिमित्ताने दूरचे प्रवास कराल. वेळेचे गणित बिघडेल. महत्वाचे निर्णय पुढे ढकला. तरुणांना व्यवसायाच्या नव्या कल्पना सुचतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मौज-मजेवर वेळ आणि पैसे खर्च होतील. शेजार्यांशी सलगी वादाला निमंत्रण देईल. खेळाडूंना मोठे यश मिळेल. मनासारखी नोकरीची संधी चालून येईल. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. नव्या घराचा प्रश्न मार्गी लागेल. भागीदारीत वादाला निमंत्रण मिळेल. उच्च शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. ज्येष्ठांशी कुरबुरी होतील.

मिथुन : घरातील वातावरण आनंददायी राहील. सणासुदीच्या निमित्ताने धार्मिक कार्य घडेल. घरातला खर्च वाढेल. नोकरीत मानापमानचे प्रसंग घडतील. सामाजिक क्षेत्रात लौकिकात भर पडेल. व्यवसायात मोठे निर्णय घेताना घाई करू नका. मामा-मावशींची मदत मिळेल. पोटातल्या गोष्टी ओठावर आणू नका. तरुण मंडळींना मनासारख्या कामाच्या संधी मिळतील. अचानक धनलाभ होईल. मित्रांबरोबरचे जुने वाद संपुष्टात येतील. सामाजिक कार्यात गौरव होईल. कलाकारांना कामाच्या नव्या संधी यश मिळवून देतील. शिक्षक, संशोधकांच्या कानावर चांगली बातमी पडेल. अडकलेली कामे नव्या ओळखीतून पुढे जातील.

कर्क : डोक्याचा ताप वाढेल. शब्द जपून वापरा. नातेवाईक, मित्रांशी वाद होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. मालमत्तेचा प्रश्न डोकेदुखी वाढवेल. नोकरीत धांदल उडेल. मोठ्या व्यक्तीचा मान ठेवा. आर्थिक बाजू तपासूनच मोठे निर्णय घ्या. नवीन व्यवसायाचीr कल्पना पुढे ढकला. कुटुंबातील समस्या संयमाने मार्गी लावा. संततीकडून शिक्षणाच्या बाबतीत आनंद देणारी बातमी समजेल. मित्रांबरोबर मौज-मजा कराल. संसर्गजन्य आजाराला निमंत्रण मिळेल. वाहन चालवताना नुकसान होईल. सरकारी कामे चौकटीत राहूनच पूर्ण करा.

सिंह : धाडसी वृत्ती जागी होऊन कामे झटपट पूर्ण होतील. अचानक घरासाठी पैसे महागडी वस्तू खरेदी कराल. नवीन मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. तरुणांचे मनस्वास्थ्य बिघडेल. आई-वडिलांशी जमवून घ्या. नोकरीत वरिष्ठ कामावर खूष होतील. कुटुंब, मित्रांबरोबर भरपूर वेळ खर्च होईल. भागीदारीत डोकेदुखी वाढेल. नियोजित काम पूर्ण करण्यात अडचण येईल. व्यवसायात मोठे आर्थिक व्यवहार त्रासदायक ठरतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकणे टाळा. आठवड्याअखेर संततीकडून चांगली बातमी कळेल. महिलांचे कामाचे निर्णय चुकतील. घरात अचानक कामाचा व्याप वाढेल.

कन्या : कामानिमित्ताने प्रवास करताना विशेष खबरदारी घ्या. व्यवसायात थकीत येणे हातात पडेल. त्याचे नियोजन करून खर्च करा. तीर्थयात्रेमधून समाधान मिळेल. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च होईल. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. तरुणांचे निर्णय चुकतील. बँकेची कामे पुढे नेताना अधिक सतर्क राहा. नवीन गुंतवणुकीचा निर्णय लांबणीवर टाका. सरकारी कामे पूर्ण होण्यास विलंब होईल. मनाची चलबिचल वाढवणारी घटना घडेल. कामापुरतेच बोला. थकीत येणे वसूल होईल. मालमत्ता, व्यवसाय याबाबतचे महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रवास करताना काळजी घ्या.

तूळ : नवीन घराचा प्रश्न मार्गी लागेल. तरुणांना नव्या कामाच्या संधी मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून उत्तम लाभ मिळतील. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. स्पर्धेचा सामना करावा लागेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. साहित्यिक, प्रकाशकांसाठी चांगला काळ. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. मित्रांशी वागताना काळजी घ्या. मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नोकरीत कामाशी काम ठेवा. मौज-मजा चैनबाजीमुळे घाटा होईल. तरुणांना कामानिमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल. खेळाडूंच्या नावलौकिकात भर पाडणार्या घटना घडतील.

वृश्चिक : संसर्गजन्य आजार त्रासदायक ठरतील. ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील. व्यवसायात यश मिळेल. नव्या ऑर्डर मिळतील. पैसा खेळता राहील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास कराल. त्यात कामाचे गणित चुकेल. आठवड्याच्या सुरुवातीला मनस्ताप होईल. सामाजिक कार्यात चांगले अनुभव येतील. तरुणांना नव्या कामाच्या संधी मिळतील. संयम कामी येईल. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. कामे अलगद पुढे जातील. कोणाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. पत्नीशी किरकोळ वाद होतील. अभिनेते, कलाकारांचा सन्मान होईल. नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. आर्थिक बाजू भक्कम होईल.

धनु : किरकोळ कारणामुळे वाद होतील. कुटुंबातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत मनाची चलबिचल वाढेल. मधुमेह, हृदयरोग असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. त्यासाठी वाढीव कष्ट पडतील. व्यवसायात मोठे निर्णय घेताना काळजी घ्या. प्रेमप्रकरणात वाद होतील. बोलण्यामुळे काम बिघडेल. घरात सहनशक्ती वाढवा. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. कोर्टाचे प्रश्न लांबणीवर पडतील. कर्जाच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करू नका. नवीन गुंतवणूक करताना घाईत घेतलेला निर्णय चुकेल. जुनी गुंतवणूक चांगला लाभ देऊन जाईल, पण, आर्थिक नियोजन करा.

मकर : नोकरी-व्यवसायात कामाशी काम ठेवा. किरकोळ वादात प्रतिक्रिया देऊ नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. धार्मिक यात्रा घडतील. व्यवसायात चांगले लाभ होतील. घरातील ज्येष्ठांचा मान ठेवा. कामात दुर्लक्ष करू नका, चुकांमुळे त्रास होईल. मित्रांची मदत कामाला येईल. आठवड्याच्या मध्याला आनंद वाढवणारी बातमी कळेल. कामाचा उत्साह वाढेल. तरुणांना शुभघटनांची प्रचिती येईल. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. विदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. सरकारी नियमांचे पालन करा. कुटुंबासाठी अचानक पैसे खर्च करावे लागतील. वेळेचे गणित बिघडेल.

कुंभ : बँकांची कामे करताना जपून. कामानिमित्ताने धावपळीचा आरोग्यावर परिणाम होईल. व्यवसायात कामाचे गणित चुकेल. नोकरीत वरिष्ठ कामावर नाराज होतील. शिक्षणक्षेत्रात उत्तम प्रगती होईल. काम वेळेत नियोजन करून पूर्ण करा. तरुणांनी अतिउत्साह दाखवू नये. उत्पन्नाचे स्रोत वाढवा. मुलाच्या वर्तणुकीकडे लक्ष द्या. नातेवाईकांशी बोलताना अधिक भावनिक होऊ नका. मित्रांना मदत करावी लागेल. आरोग्याच्या समस्या डोके वर काढतील. पत्नीशी वाद होतील. सामाजिक जीवनात वावरताना जपून. कलाकारांना नवी कामे मिळतील. कुटुंबात कलह टाळा. समजूतदारपणा कामी येईल.

मीन : नोकरीत मनासारखी घटना घडेल. व्यवसायात मोठे यश मिळेल. बँकेची कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. धार्मिक सहलींमधून समाधान मिळेल. मित्रांमधील दुरावा दूर होईल. मुलांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्या. व्यवसायात मंदीचा फटका बसेल. प्रेमप्रकरणात शब्दात अडकून पडू नका. मार्केटिंग क्षेत्रात त्रास होऊ शकतो. बंधूंकडून सहकार्य मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. दानधर्म कराल. चमचमीत खाण्याचा मोह टाळा. नोकरीत पगारवाढ, बढतीचे योग आहेत. आठवड्याअखेर घवघवीत यश मिळवून देणारा काळ अनुभवाल.

