• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य ( २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६)

भास्कर आचार्य

Marmik Team by Marmik Team
November 28, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

मेष : तरुणांना प्रतिष्ठा मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. शिक्षणक्षेत्रात नव्या संधी मिळतील. घरासाठी वेळ द्याल, धार्मिक सहलीला जाल. महिलांनी आरोग्य सांभाळावे. राग डोक्यात ठेवून काम करू नका. व्यवसायात आमदनी व खर्चाचा ताळमेळ साधा. नोकरीत कामाचे नियोजन अचूक करा. झटपट कामे पुढे नेण्याच्या भानगडीत पडू नका. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कलेतून पैसे मिळतील.

वृषभ :
नोकरीत ताण वाढेल. घरात वाद टाळा. तरुणांचे मनस्वास्थ्य खराब होईल. लॉटरी, सट्ट्यापासून दूर राहा. व्यवसायात आर्थिक व्यवहारांत काळजी घ्या. सार्वजनिक जीवनात गैरसमज टाळा. संगीतकार, कलाकार, ब्रोकर यांच्यासाठी चांगला काळ. चंचल स्वभावाला मुरड घाला. आश्वासने देऊ नका. व्यवसायात यश मिळेल. भागीदारीत वाद होतील. अति उत्साह नको. महिलांना यश मिळेल.

मिथुन : आर्थिक नियोजनात चुका टाळा. भावंडांना मदत करावी लागेल. नोकरीत कामासाठी प्रवास करावा लागेल. तरुणांचे निर्णय चुकतील. उधारीचे व्यवहार त्रासदायक ठरतील. व्यवसायात नवीन प्रयोगांत यश मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. घरात महागडी वस्तू खरेदी करण्याचे नियोजन बिघडेल. इस्टेट एजंट, पत्रकार, प्रकाशक, कवी, लेखक, यांना यशदायी काळ. बोलताना काळजी घ्या.

कर्क : सरकारी कामांत शॉर्टकट नको. तरुणांना योग्य मार्गदर्शक सापडेल. स्पर्धेत लहान यशाने हुरळून जाऊ नका. पोटाचे विकार त्रासदायक ठरतील. नोकरीत चुका करू नका. मुले डोकेदुखी वाढवतील. उधारीचे व्यवहार टाळा. व्यवसायात सबुरीने घ्या. नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. पैशाच्या नियोजनात चुका टाळा. मित्रांच्या बाबतीत भावनेच्या आहारी जाऊन काही करू नका.

सिंह : व्यवसायात भाग्य उजळेल. यंत्रावर काम करणार्‍यांनी खबरदारी घ्यावी. तरुणांना विदेशात कामाची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव होईल. वाहन चालवताना खबरदारी घ्या. नोकरीच्या दगदग होईल. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे तपासा. चेष्टा-मस्करी टाळा. कोणाला सल्ला देऊ नका. तरुणांना संयम आणि नम्रपणाचा फायदा होईल. जुने आजार पुन्हा डोके वर काढतील.

कन्या : व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. बँकेची कामे मार्गी लागतील. भागीदारीत वाद सुटतील. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. नियमात राहून काम करा. मुलांना यशदायी काळ. नोकरीत कसोटीच्या क्षणांचा सामना कराल. खरेदी-विक्रीत कागदपत्रांची तपासणी करून पुढे जा. घरासाठी नवीन खरेदी कराल. कलाकार, लेखक, प्रकाशकांना सुवार्ता कळेल.

तूळ : शेअर, सट्टा यात तोटा होईल. व्यवसायात ज्येष्ठांचा सल्ला कामी येईल. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुमार्गाने पैसे कमावू नका. अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. व्यवसायात यश मिळेल. मित्रांशी जुने वाद उकरून काढू नका. प्रेमप्रकरणात काही गोष्टी माफ करा. सामाजिक कार्यात गौरव होईल. खेळाडूंना यश मिळेल. तरुणांना अनपेक्षित ताण येतील. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक : नोकरी, व्यवसायात प्रश्न मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. मामाकडून आर्थिक मदत मिळेल. कामानिमित्ताने विदेशात जाल. मित्रांशी संयमाने वागा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तरुणांनी मर्यादेत राहावे. गोड बोलून काम पुढे न्या. बँकेत नवीन कर्ज मिळवण्याचे प्रयत्न पुढे जातील. बोलण्यामधून गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. नवीन वास्तू घेण्याचा विचार पुढे जाईल.

धनु : तरुणांना, व्यावसायिकांना यशदायी काळ. खेळाडूंना आणखी कष्ट घ्यावे लागतील. नवे करार करताना काळजी घ्या. बँकेच्या कामांत खबरदारी घ्या. घरात किरकोळ गोष्टी वादाला निमित्त ठरतील. नातेवाईक, मित्रांचे सहकार्य मिळेल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. शिक्षक, संशोधकांना नव्या संधी मिळतील. वास्तू, मालमत्ता, जमीन जुमल्याचे व्यवहार करताना काळजी घ्या. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ.

मकर :
आरोग्याची पथ्ये पाळा. महिलांनी कामात अधिक दक्षता घ्यावी. तरुणांना मोठ्या संधी चालून येतील. नोकरीत कौतुक होईल. प्रमोशन, पगारवाढ होईल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. बँकांची कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात आमदनी चांगली राहील. लेखक, प्रकाशकांना मानसन्मान मिळेल. मौज-मजेसाठी वेळ खर्च कराल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कर्षाचा काळ.

कुंभ : आर्थिक व्यवहारांतून त्रास वाढू देऊ नका. शिक्षण क्षेत्रात गौरव होईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. ज्येष्ठांच्या शब्दाचा आदर करा. वरिष्ठांचे मन सांभाळा. नोकरीत लक्षपूर्वक काम करा. महिला व्यावसायिकांना यश मिळेल. नवीन गुंतवणूक करताना सावधान. कवी, कलाकार लेखक, खेळाडूंसाठी चांगला काळ. एखादी शुभघटना कानावर पडेल. मित्रमंडळींना मदत करावी लागेल.

मीन : भावंडांशी जमवून घेताना तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात धावपळ करावी लागेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. इतरांचे बोलणे मनावर घेऊ नका. परदेशवारीचे योग आहेत. जुन्या चुका टाळा. शिक्षक, संशोधक, प्राध्यापकांना सुखद बातमी कळेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तरुणांनी परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवावी.

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

चंद्रविलास उपहारगृह

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.