ग्रहस्थिती : रवि, शुक्र मेषेत, हर्षल-वृषभेत, गुरू मिथुनेत, मंगळ, बुध, शनि, नेपच्युन मीन राशीत, केतु सिंहेत, प्लूटो मकरेत, राहु कुंभेत. दिनविशेष :१९ एप्रिल अक्षय तृतीया, श्री परशुराम जयंती,२० एप्रिल श्रीविनायक चतुर्थी, २३ एप्रिल गुरुपुष्यामृत योग, २४ एप्रिल दुर्गाष्टमी, श्री शंकर महाराज पुण्यतिथी

मेष : कामात मनावर संयम ठेवा. नोकरी-व्यवसायात गैरसमज निर्माण होतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वासून व्यवहार करू नका. दूरचे प्रवास लांबणीवर टाका. बंधूंचे सहकार्य राहील. त्यामुळे मोठे प्रश्न सोपे होतील. घरासाठी वेळ खर्च होईल. नव्या जबाबदार्या वाढतील. नातेवाईक, जुने मित्र यांच्या गाठीभेटी होतील. व्यवसायवृद्धीचे संकेत आहेत. नव्या कल्पना आकाराला येतील. तरुणांना यशदायी काळ. नोकरीत ताण वाढेल. आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. महिलांना यश मिळेल. आर्थिक बाजू चांगली राहील. जुने येणे वसूल होईल. रागावर नियंत्रण ठेवा. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा.

वृषभ : नोकरी-व्यवसायात कटकटीचे प्रसंग येतील. अपेक्षाभंग होईल. आश्वासने देऊ नका, कामाचे गणित बिघडेल. तरुणांना वाढीव कष्ट पडतील. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नको. सार्वजनिक ठिकाणी संयम ठेवा. अतिआत्मविश्वास टाळा. आठवड्याच्या शेवटी कंटाळाल. सामाजिक क्षेत्रातील कामांमधून समाधान मिळेल. कलाकारांना यश मिळेल. नव्या प्रोजेक्टमधून चांगली कमाई होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल.

मिथुन : हातातले काम आनंदाने पुढे न्या. चिंता करत बसू नका. नोकरीत मताशी ठाम राहा. कामाच्या नव्या संधींमधून लाभ मिळेल. व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नका. शेअर, लॉटरीमधून आर्थिक नुकसान होईल. अहंकार, हट्टीपणा सोडा. तरुणांचा अपेक्षाभंग होईल. उधार-उसनवारी करू नका. घरात खर्च वाढतील. नवी नोकरी मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. घरात विचारपूर्वक निर्णय घ्या. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. मुलांकडे लक्ष द्या. शिक्षण, संशोधन क्षेत्रात उत्तम काळ.

कर्क : वाद डोकेदुखी वाढवतील. भावना आणि व्यवहारांची गल्लत नको. निराशेने कोणतेही काम करू नका. नोकरीनिमित्ताने प्रवास कराल. व्यवसायात वेळेचे गणित बिघडेल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रसिद्ध व्यक्तींच्या भेटी होतील. पटकन व्यक्त होऊ नका, गैरसमज होतील. तरुणांना अपेक्षित फळे मिळतील. मौज-मजेवर खर्च होईल. कलाकारांचा सन्मान वाढवणार्या घटना घडतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या. जुनी मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रे तपासा. खेळाडूंना यशदायी काळ.

सिंह : कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवून काम करू नका. मित्रांबरोबर जवळीक नकोच. नोकरीत चुका होतील. काळजी घ्या. व्यवसायात काही गोष्टी सबुरीने घ्या. लहान गोष्टीतून आनंद मिळवा. मुलांशी सौजन्याने बोला. तरुणांना यशासाठी अधिकचे कष्ट पडतील. महिलांना स्वभावाला मुरड घालावी लागेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. खर्च करताना काळजी घ्या. मौज-मजा नकोच. खेळाडूंना यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. नोकरी-व्यवसायात कार्यक्षेत्र वाढेल.

कन्या : कामात सावध राहा. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. मित्रांची मदत कामी येईल. जुन्या गोष्टी काढून भविष्य खराब करू नका. समाजात प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लावण्याचे नियोजन करा. मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. वाहन चालवताना काळजी घ्या. शेअर, लॉटरीमधून कमाई कराल. महिलांना आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. आर्थिक आवक चांगली राहील.

तूळ : नावीन्याचा ध्यास यश देईल. कामात आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात बुद्धीचातुर्याच्या जोरावर यश मिळवाल. स्वावलंबनाचे धोरण आणि नोकरीत सकारात्मकता कामी येईल. वेळेचे गणित सांभाळा. खेळाडूंना यशासाठी वाढीव धडपड करावी लागेल. तरुणांचे कामाचे गणित बिघडेल. सार्वजनिक ठिकाणी संयमाने घ्या. शिक्षणक्षेत्रात नव्या संधी मिळतील. समाजकार्यात प्रतिष्ठा वाढेल. कामातून आनंद मिळेल. नव्या ओळखीमधून अडकलेले काम मार्गी लागेल. सरकारी कामे पूर्ण होतील. मुलांकडून शुभ बातमी कळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघाताला निमंत्रण मिळेल.

वृश्चिक : नोकरी-व्यवसायात वाढीव कष्ट पडतील. आत्मपरीक्षणातून यश मिळेल. तरुणांच्या कामाचे गणित बिघडेल. नव्या ओळखीतून कामे पुढे सरकतील. मालमत्तेचा विषय पुढे ढकला. वाद टाळा. आजारपण त्रासदायक ठरेल. काही कामे विलंबाने पूर्ण होतील. नातेवाईक, मित्र यांचे सहकार्य मिळेल. जवळच्या व्यक्तीबाबत सुवार्ता कळेल. लेखक, साहित्यिकांचा हुरूप वाढेल. नोकरीच्या प्रयत्नांना यश मिळेल. वादात मध्यस्थी करू नका. व्यवसायात नोकरवर्गाकडून त्रास होईल. बेबंद खर्च टाळा.

धनु : पडताळणी करूनच पुढे जा. यशासाठी वाढीव कष्ट करा. कोणावर विश्वासून निर्णय घेऊ नका. नोकरीत न पटणार्या घटनांकडे दुर्लक्ष करा. समाजकार्यातून आनंद मिळेल. व्यवसायात आत्मविश्वास वाढेल. तरुणांची प्रसन्नता वाढेल. आश्वासने देण्याच्या भानगडीत पडू नका. विवाहेच्छुंसाठी चांगला काळ. घरात नवे आव्हान समोर उभे राहील. कामानिमित्ताने विदेशात जावे लागेल. सरकारी कामे झटपट मार्गी लागतील. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यवसायात चांगला लाभ मिळेल. कलाकारांना उत्तम काळ.

मकर : धाडस अंगाशी येऊ शकते. व्यवसायात अडचणी वाढू देऊ नका. नोकरीत बोलण्याच्या जोरावर कामे सुलभ होतील. युक्तीच्या गोष्टी कामी येतील. सरकारी कामात घाई टाळा. मामाकडून मदत होईल. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. घरात जमवून घ्या. ज्येष्ठांच्या प्रकृतीच्या समस्या निर्माण होतील. कामाचा कंटाळा येईल. मित्रांबरोबर भटकंती होईल. वादात मध्यस्थी करणे टाळा. नव्या व्यवसायाची घडी बसेल. सामाजिक कार्यात मन रमवाल. घरात आनंद साजरा होईल. दाम्पत्यजीवनात सुख मिळेल.

कुंभ : कामाचा वेग वाढेल. नव्या संधी यशदायी ठरतील. शॉर्टकटचा वापर करू नका. नोकरीत वाद घालू नका. आजचे काम उद्यावर ढकलू नका. आर्थिक घडी भक्कम होईल. घरासाठी वेळ खर्च करावा लागेल. दाम्पत्यजीवनात किरकोळ कुरबुरी घडतील. आरोग्य सांभाळा. मित्रांशी अधिकची जवळीक करू नका. मेडिकल क्षेत्रात चांगले अनुभव येतील. मान सन्मान मिळेल. कुणालाही उधार उसनवारी देणे टाळा. आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील. खेळाडूंना, कलाकारांना यश मिळेल.

मीन : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. बोलताना काळजी घ्या. एक शब्द डोकेदुखी वाढवू शकतो. नवीन वाहन घेण्याचा विषय पुढे सरकेल. मुलांचे शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या. बँकेच्या कामांना विलंब होईल. आर्थिक गणित विस्कटेल. सामाजिक कार्यातून प्रगती कराल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. सगळीकडे संयमी भूमिका घ्या. कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करा. कुणाच्या सल्ल्याने निर्णय घेऊ नका.

