• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मैफल रंगते तेव्हा!

टोक्या टोचणकर (टोचन)

Marmik Team by Marmik Team
November 29, 2026
in इतर, भाष्य
0
मैफल रंगते तेव्हा!

दिवाळीनिमित्त सत्ताधारी मंत्री आणि त्यांच्या वळचणीला असलेले त्यांचे सहयोगी यांचे सांस्कृतिक संमेलन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिल्लीत आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वत: आठवले यांनी केले होते. त्या कार्यक्रमाची व्हिडियो टेप माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याने कशी मिळवली ते माहीत नाही. त्याच टेपमधला हा निवडक भाग-

रामदास आठवले : आपले सगळ्यांचे मी करतो स्वागत। त्याचे बोल ऐकल्याशिवाय माझे नाही भागत। मित्रांनो, दीपावलीच्या निमित्ताने आपल्या गुणांच्या दर्शनासाठी आपल्याला पाचारण केले आहे. मी एकेकाचे नाव घेईन, तसे त्यांनी पुढे येऊन आपले कलागुण दाखवावेत. प्रथम येतील आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी… गेल्या दहा वर्षांत त्यांनी देश किती पुढे नेला। त्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही गुड डे गुड डे बोला।

मोदी : आज मुझे मेरे बीते हुए दिन याद आते है। जब मै चाय बेचता था। कभी कभी वहाँ चाय पीने मेरे जिगरी दोस्त अमित शहा भी आते थे। चाय पिते पिते हम गाना भी बोलते थे। अमितजी बोलते थे, शायद तेरे चाय का कमाल, मुँहमे आया है इसिलिये मम्मीने मेरे तुझे चाय पे बुलाया है।… फिर मैने भी मेरी चायकी पब्लिसिटी का गाना गाया… दुनियाभरकी टेन्शन पल भर मे मिट जाय। चुस्की लेकर पीता हूँ, जब अद्रकवाली चाय। घूँट घूँट को इसके मैं करता हूँ एन्जॉय। चुस्की लेकर पीता हूँ मै अद्रकवाली चाय। प्यारी सी खूशबू इसकी दिल मे ना समाए। चाय बिना तो हम कैसे दिन बिताए। दिनभर की थकावट पल भर मे मिट जाए। चुस्की लेकर पीता हूँ मै अद्रकवाली चाय।।
रामदास आठवले : बहोत खूब! मोदी आणि शहा जेव्हा एकत्र चहा पितात। तेव्हा तर ते वाघ होतात, सगळे त्यांना भितात। आता आपण अमितजी शहा यांना बोलावू या. या अमितजी…

अमित शहा : मैं क्या बोलू? शहा ना बोले! ना बोले ना बोले रे। अंदर की बात ना खोले रे। नरेंद्रजी के साथ फ्रेंडशिप होने के बाद मुझे तो कौवेवाला गाना बहोत प्यारा लगता था। झूठ बोले कौवा काटे, काले कौवेसे डरियो। मै दिल्ली चला जाऊँगा तुम देखते रहियो। एक दिन चाय पीते पीते हमने तय किया की एक ना एक दिन हम इस हिंदुस्थान पे राज करेंगे। दस साल पहले हमारा सपना सच हुआ। हमे इसका गर्व है। हमारी दोस्ती अमर है। मै गानेमे मेरी इमोशन्स कह देता हूँ। ये ऽऽ दोस्ती हम कभी ना छोडेंगे, छोडेंगे दम मगर, उसका साथ ना छोडेंगे…

आठवले : क्या गाया आपने! वा! आम्हाला वाटले होते काळीज तुमचे दगडासारखे। तुमचे गाणे ऐकून आता शत्रू होतील तुम्हाला पारखे। नितीन गडकरी साहेब, असे पुढे या.

गडकरी : मी आहे तिथेच बरा आहे. मला काही पंतप्रधान व्हायचे नाही की राष्ट्रपती. माझी खुर्ची मला प्यारी, जरी असली मोडकी तोडकी! माझ्या खाण्यावरून बरेचजण मला चिडवतात. पण खाणे आणि गाणे हा माझा स्वभाव आहे, त्यांच्याशिवाय जगण्याचा, माझ्या जीवनात अभाव आहे. मी खातो काजू बदाम, अक्रोड आणि मनुका पिस्ता, म्हणून बुद्धी तल्लख आहे, तरीही खाव्या लागतात खस्ता.

आठवले : मलासुद्धा कधी कधी वाटते नितीन गडकरींसारखे व्हावे। नागपुरात काड्या करत आनंदाने मजेत राहावे. धन्यवाद गडकरीजी, या या, मोहन भागवतजी. लोक असं का म्हणतात हो, संघ दक्ष, नको तिथे लक्ष!

भागवत : मी स्वत:ला संघाचा निष्ठावंत कार्यकर्ता समजतो. लोकांची सेवा हेच आमचे व्रत. त्यापुढे सारे काही आम्ही झूठ समजतो. मी नेहमी म्हणतो आपल्या राष्ट्राला आपल्या धर्माच्या मोठ्या लोकसंख्येची गरज आहे. म्हणूनच माझे आवाहन असते, दो या तीन बस्स नको. एक क्रिकेटची टीम तयार झाली पाहिजे या पुढे प्रत्येक घरात. तरच या देशाची प्रगती होईल.

आठवले : आज चीनची लोकसंख्याही घटत चालली आहे. जास्त मुले व्हावीत म्हणून तिथले सरकार जनतेला नवनवी प्रलोभने दाखवत आहे. उद्या ही पाळी भारतात येणार नाही कशावरून? पण त्यासाठी तरुण तरुणींना लग्ने तर केली पाहिजेत. नेतेच अविवाहित राहिले तर त्यांना हे सागण्याचा अधिकार उरतो का? तरीही तुमचं म्हणणं मला पटतं. कारण त्यात दिसते तुमची कळकळ, त्यामुळे अनेकांच्या पोटात होते मळमळ. तुम्ही प्रचार करत राहा, पोरे होतील पटपट पाहा!

Previous Post

‘मोदीनॉमिक्स’चा भुलभुलय्या!

Next Post

गोष्ट एका पेनाची

Next Post
गोष्ट एका पेनाची

गोष्ट एका पेनाची

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.