• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

Marmik Team by Marmik Team
October 17, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
बाळासाहेबांचे फटकारे

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश महाराष्ट्रात आणण्याचा मान पं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांना दिला. राज्यातले अत्यंत सुसंस्कृत राजकारणी ही त्यांची ओळख होती आणि राज्याच्या सर्वोच्च नेतेपदावरून त्यांनी नेहमी बेरजेचं राजकारण केलं. सर्व समाजघटकांना काँग्रेस पक्षाशी जोडून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे शेजारी राष्ट्रांच्या आक्रमणाच्या वेळी दिल्लीची हाक आली आणि हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला, असा यशवंतरावांच्या दिल्लीच्या प्रस्थानाची कौतुकाने उल्लेख झाला. राज्यभरात सर्व थरात आणि विरोधकांमध्येही आदराचं स्थान असलेल्या यशवंतरावांनाही बाळासाहेब प्रसंगी सोडत नव्हते, याचं दर्शन घडवणारं हे परखड व्यंगचित्र. प्रसंग नारायणरावाच्या खुनाचा. राघोबादादांना बिलगून जिवाची याचना करणार्‍या नारायणरावाला जिवंत ठेवायचं की सोडायचं, याचा पैâसला राघोबादादांनी करायचा होता. प्रखर सत्तालालसेपायी त्यांनी सख्ख्या पुतण्याला मरू दिलं. हा प्रसंग बाळासाहेबांनी सीमाभागातील जनतेची साथ सोडण्याच्या काँग्रेसच्या आणि यशवंतरावांच्या अक्षम्य अपराधाच्या अनुषंगाने वापरला आहे इथे. नारायणराव बनली आहे सीमाभागातली जनता आणि पंतप्रधानपदाच्या मोहापायी यशवंतरावांनी तिला वार्‍यावर सोडलं असा या व्यंगचित्राचा आशय आहे. आजचे मूळचे स्वतंत्र विदर्भवादी राघोबादादा पंतप्रधानपदाची दिवास्वप्नं पडू लागताच संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला वार्‍यावर सोडायला, महाराष्ट्राचा उत्तर भारत करायला एका पायावर तयार आहेत. मागासबुद्धीची वाहक असलेल्या हिंदी भाषेचा वरवंटा स्वत:च्या हाताने महाराष्ट्रावर फिरवायलाही ते कमी करत नाहीत.

Previous Post

लार्जर इन लाइफ

Next Post

एक हट्टी मुलगी!

Next Post
एक हट्टी मुलगी!

एक हट्टी मुलगी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.