• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

Marmik Team by Marmik Team
October 9, 2026
in भाष्य
0
नाय नो नेव्हर
विवाहित पुरुषांपेक्षा विवाहित स्त्रिया अधिक आनंदाने जगतात आणि अधिक काळ जगतात, असं संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. काय कारण असेल असं होण्याचं, एनी आयडिया? -समद शेख, सांगली
विवाहित पुरुष सुखी असतो का? यावरचं संशोधन अजून कोणी केलेलेच नाहीये… आणि केलं असेल तर कोणी प्रकाशित करण्याचे डेरिंग केलेले नाहीये. त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय… स्त्रियांच्या आनंदाचं संशोधन करू नका, पुरुषांच्या दुःखात भर पडेल…
बायको संतापली तर मैत्रीणीकडे जाता येतं, ती जिवाला विरंगुळा देते. पण मैत्रीण संतापली, तर कुणाकडे जायचं? -संदीप शिर्के, सावनूर
अहो दाजीबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं न्हवं…  असं म्हणणारी कोणी भेटते आहे का पाहा कुठे!
‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! दोन प्रश्न आहेत. एकतर दादा कोंडके यांच्यासारख्या हजरजबाबी शाहिरानं अजरामर केलेलं नाटक करताना तुलनेच्या कल्पनेने दडपण येत नाही का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, दादा दर प्रयोगाला त्या त्या काळातल्या घडामोडींनुसार बिनधास्त राजकीय भाष्य करायचे, टोले मारायचे. आता तुम्ही तसं करू शकाल का? -श्रीनिवास माने, आटपाडी
जो दादांशी स्वत:ची तुलना करेल, त्याची तुलना मूर्खाशीच होऊ शकेल, हे आमच्या डोक्यात पक्कं आहे. त्यामुळे इतर कुणी आमची त्यांच्याशी कितीही तुलना करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची भीती नाही… आणि राजकीय भाष्य करायचं किंवा टोले मारायचं म्हणाल तर ते आम्ही असेही आणि इथेही आणि तिथेही नित्यनेमाने करत आहोत… यापुढेही करत राहू… आणि हो, तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, तसं या नाटकाच्या बाबतीत होईल असं वाटत नाही. कारण ‘देवाची विटंबना केली अशा बोंबा मारत आरोपांच्या पैâरी झाडण्यासाठी खांदा कोणाचा वापरणार? कारण या नाटकात कोणी देव सुद्धा नाहीये…
राज्यात दुष्काळ आहे. देशावर आर्थिक संकट घोंघावतंय. सामान्य माणसाने हे वापरणं सोडावं, सामान्य माणसाने अशी काटकसर करावी, असं सांगणारा देशपातळीवरचा किंवा राज्य पातळीवरचा एकही सत्ताधारी नेता स्वत: साधेपणाने जगताना दिसत नाही. लोकांना ब्रह्मज्ञान सांगण्याचा अधिकार यांना लाभतो कुठून? -विनीता सामंत, प्रभादेवी
‘आपुनीच भगवान है’ असं वाटू लागलेल्या नेत्याला आणि त्याच्या भक्तांना अधिकार देणारा ब्रम्हदेव कोण? ब्रह्मदेवालाच ज्यांनी बनवला आहे, त्यांना ब्रह्मदेव काय अधिकार देणार? त्यांना जे ज्ञान आहे असं त्यांना वाटतं ते ज्ञान त्यांच त्यांनीच मिळवलेलं आहे… त्या ज्ञानाचा त्यांना स्वतःला उपयोग नसतो… म्हणून ते इतरांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात… त्यातून लोकांना ब्रह्मज्ञान मिळतं आणि पाषाण कोरडा तो कोरडाच राहतो… आता त्या दगडावर आपण डोकं  आपटलं तर आपलंच डोकं  फुटणार, एवढी अक्कल आम्हाला आहे. त्यामुळे आता ते काय अक्कल चालवतात, ते बघणं जास्त इंटरेस्टिंग आहे.
आपल्याच घरात दुसर्‍या खोलीत बसलेल्या माणसाला लोक  व्हॉट्सअपवरून शुभेच्छा देतात, व्हॉट्सअपवरूनच ख्याली खुशाली विचारतात. उठून दोन पावलं चालून एकमेकांना भेटत आणि बोलत का नाहीत लोक?   -बबन पांडे, अमरावती
जिथे आपल्या भावनांना किंमत नसते, तिथे भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्षात उठलं तरं आपली लायकी निघण्याची शक्यता असतेष्ठ तेव्हा उलट तुम्हीच सावध रहा… भावनेच्या भरात वाहत जाऊ नका… कोणालाही पर्सनली विश करायच्या फंदात पडू नका… नाही तर… चार भिंतीतली लायकी  ऑनलाइन होते…  त्यातून त्यांना रीच मिळतो, पण आपल्या लायकीचा खेळ होतो…
थापेबाजीच्या, बनावट हल्ले, बनावट स्ट्राइक आणि काहीही डीपफेक बनवणार्‍या एआयच्या जमान्यात हल्ली कशावर म्हणजे कशावरही विश्वास बसत नाही. खरं काय आणि खोटं काय हे ओळखायचं कसं संतोषराव? -विजय कारखानीस, सोलापूर
एआयलाच विचारायचं… ज्याची विद्या त्याला… आणि त्यातूनही दुसर्‍यांचं खरं खोटं कळत नसेल तर आपण खोटं वागायचं नाही… दुसर्‍याच्या फाटक्यात आपला पाय घालायचा नाही… बघा वागून असं… खरं खोटं करण्याची गरजच पडणार नाही.
निवडणूक आयोगाच्या मनमानीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा विशाल मोर्चा पाहिल्यावर ‘मुंबईतून ठाकरे संपले’ असं म्हणणार्‍यांना उत्तर मिळालं असेल का आता तरी? – शैलेश देशमुख, भायखळा
कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेल्या आणि तोंडावर पडलं तरी तंगड्या वर आहेत ना, असं म्हणणार्‍यांना तुम्ही कितीही उत्तर द्या, त्या निलाजर्‍यांना काहीही फरक पडत नाही… मग त्यांच्या प्रश्नाचं तुम्हाला का पडावं?
Previous Post

विजय पेंडसे – इस्रोतला मराठी शास्त्रज्ञ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.