
जंतरमंतर
तरुणाई पेटून उठते तेव्हा
हुकूमशहाही गळून जातात
कमरेला ते पाय लावून
संसदेतून पळून जातात

नाही घेतले गांभीर्याने
वाटले पोरे करतील काय
संसदेवरी चालून जाता
आता आठवली आय माय
नव्हता पोकळ हा इशारा
तरुण-तरुणींचा हा एल्गार
हेच उद्याचे क्रांतिकारक
मोदी–सत्तेला करतील गार
झुरळ
माझी उपमा देऊन त्यांनी
आंदोलकांना केले बदनाम
त्याच झुरळांनी ताकद दाखवत
मोदी-शहांना फोडला घाम

एरव्ही आम्ही त्रिरुपद्रवी
कुरुप आणि ध्यानही विद्रुप
अशी एकजूट नाही पाहिली
जिला ठरलो आम्हीच प्रेरक
मला पाहूनी घाबरती किती
किंचाळती त्या शूर बायका
जंतमंतर पाहूनी म्हणती
कळले आता तुम्ही श्रेष्ठ का!
भारतमाता
सत्ताधार्यांची कातडी कशी
असते गेंड्यासारखी जाड
कितीही फटके मारले तरीही
झोपी जातात अगदी गाढ

त्यांना ऐकूच येत नाही
फुटके असतात त्यांचे कान
डोळे असूनही दिसत नाही
असते आकाशाकडे मान
तोंड असूनही बोलत नाहीत
मुकेच असतात त्यांचे ओठ
मंदिर लुटले तरीही गप्प
आहेच त्यांच्या मुदलात खोट
रमेश म्हात्रे
असे वाटले होते मजला
जामीनामुळे झाले `कल्याण’
हायकोटाने केले वांदे
थोबाडावर हाणली वहाण

स्वप्ने किती रंगवली होती
एकेकाचा घेईन बदला
हायकोर्टाने केला चुराडा
मान पकडूनी जेलात टाकला
पुढे पाहुया काय होते ते
सुनावणीची पाहतोय वाट
देतील शिक्षा कसली नकळे
लवकर टाकतील माझी खाट
एकनाथ शिंदे
कसल्या पेट्या, कसले खोके
कसली असते लोकशाही
एकेकाला सरळ करी माझ्या
आमदारांची धोपटशाही

आंजारुन गोंजारुन त्यांना
मुळीच काही कळत नाही
माझेच ऐकत नाहीत आता
किती लावल्या मुस्काटातही
मला कुठे वेळ असतो
फोडाफोडीत असतो दंग
मोदी-शहाच्या चरणापाशी
उधळत असतो माझे रंग
