लॉकडाऊनमधून देश हळूहळू बाहेर पडून सिनेमागृहे सुरू झालेली असतानाही विद्युत जामवाल आणि श्रुती हसन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पॉवर’ हा सिनेमा झीप्लेक्स या ओटीटी माध्यमावरच 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त हा सिनेमा पाहण्यासाठी अॅपचे वर्षभराचे सदस्यत्व घ्यायची मुळीच गरज नाहीये. केवळ तो पाहायला म्हणून काही रक्कम अदा करावी लागणार आहे.
साधारण 90च्या दशकाची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात गीतसंगीत, प्रेम, द्वेष, बदला आणि देशप्रेम हे सर्व काही अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे हा पूर्ण एन्टरटेनर सिनेमा ठरेल असा निर्मात्यांचा दावा आहे. या सिनेमाबाबत बोलताना झीप्लेक्सचे सीईओ शरीक पटेल म्हणाले की, हा सिनेमा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल यात आम्हाला शंका वाटत नाहीये. संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून तो पाहाता येईल, असेही ते म्हणाले.