स्टार भारत वाहिनीवर ‘अम्मा के बाबू की बेबी’ ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. त्याचे प्रोमोही आता सुरू झाले आहेत. या मालिकेत अम्मा या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विभा छिब्बर दिसणार आहेत, तर बैबू म्हणून करण खन्ना आणि बेबी म्हणून गौरी अग्रवाल चमकणार आहेत. अनुभवी विभा छिब्बर मोठ्या कालांतराने या मालिकेतून पुनरागमन करीत आहेत. करण आणि गौरी या नवोदितांना त्या मेंटर म्हणून उपयोगी पडू लागल्या आहेत.
प्रत्येक सीनच्या वेळी त्या या दोघांना अभिनय कसा करावा, कसा करू नये हे समजावत असतात. करण आणि गौरीही विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन आत्मसात करत आहेत. ही मालिका वाराणसीच्या पार्श्वभूमीवर घडत असल्याने तेथील विशिष्ट बोली विभा छिब्बर या दोघांना वेळोवेळी सांगत असतात. विभा यांना बॉलीवूड चित्रपटांचा अनुभव असल्यामुळे त्या अभिनयात परफेक्ट आहेत. नवोदितांना आपल्या अनुभवातील थोडे दिले तर ते आपले नाव काढतील, अशी विभा यांची धारणा आहे. ही मालिका नुकतीच 8 फेब्रुवारीपासून स्टार भारतवर सुरू झाली आहे.