भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या हस्ते आज या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. भारतीय स्पायडर-मॅन पवित्र प्रभाकरला भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल यांनी आवाज दिला आहे. मुंबईत एक कार्यक्रमात प्रेक्षकांना पवित्र प्रभाकरच्या जगाची ओळख शुभमनने करून दिली.
‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटात द्वारे हॉलिवूड मधील चित्रपट पहिल्यांदाच इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली या दहा भाषेत 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपट जागतिक पातळीवर अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेत भारतात एक दिवस अगोदर रिलीज होणार आहे!