मुळात बॉलीवूडमध्ये महिलाप्रधान चित्रपट कमीच बनतात. पण जे काही बनतात त्यातच तीन वर्षांपूर्वी ‘नूर’ हा एक सिनेमा बनला होता. त्यात सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत होती. याच सिनेमात मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे हिचीही एक भूमिका होती. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या याच सिनेमाच्या आठवणी स्मिता तांबेने इन्स्टाग्रामद्वारे आज जागवल्या. या पोस्टमध्ये स्मिताने ‘नूर’ सिनेमाच्या वेळचा एक फोटो शेयर करत आपला अनुभव व्यक्त केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, शिबानी दांडेकर, कानन गिल आणि मनीष चौधरी हेही दिसत आहेत.
आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘नूर… या महिलाप्रधान चित्रपटात मला भूमिका मिळाली याचा आनंद मला कायमच राहील.’ स्मिता तांबेने शेयर केलेला फोटो ‘नूर’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळचा आहे हे स्पष्टच दिसत आहे. तिच्या अल्बममध्ये हा फोटो तिने खूपच सांभाळून ठेवला असणार हे नक्की. एकूणच बॉलीवूडमध्ये काम मिळण्याचा आणि त्यातही सोनाक्षी सिन्हासोबत स्क्रीन शेयर करण्याचा अनुभव वेगळा तर निश्चितच असणार.. स्मिता तांबे सध्या झी मराठीवरील एका मालिकेत महिला डॉनची भूमिका साकारतेय.