नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपला पराभवाची धूळ चारत लामज ग्रामपंचायतीतील 25 वर्षांची सत्ता उलथवली आहे. येथे सातपैकी शिवसेनेच्या पाच सदस्यांचा दणदणीत विजय झाला आहे. या खणखणीत विजयानंतर शिवसेनेच्या शिलेदारांनी गुलाल उधळत लामजवासीयांचे आभार मानले आहेत.
भिवंडी तालुक्यातील लामज ग्रामपंचायतीवर गेल्या 25 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र कोणतीही विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे नाराज मतदारांनी भाजपला मतपेटीतून हिसका देत शिवसेनेच्या शिलेदारांना निवडून दिले आहेत.
ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले असून प्रथमच शिवसेनेचा सरपंच विराजमान होणार आहे. शिवसेनेचे दिनेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. सुप्रिया देवरुखकर, सागर निकम, दीपिका चव्हाण, उषा पाडसे यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
देवरुखकर, अनंत निकम, विकास उतेकर, अनिल चव्हाण, अतिष चव्हाण, सुशांत चव्हाण, शैलेश निकम, भावेश चव्हाण, प्रवीण मोरे, अक्षय जाधव, गणेश चव्हाण, योगेज चव्हाण उपस्थित होते.