रिचा चड्ढा हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शकिला’ या सिनेमात साऊथमध्ये एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री शकिला हिचा जीवनपट दाखवलेला आहे हे सर्वांना माहीत आहे. इंद्रजीत लोकेश यांचे दिग्दर्शन असलेल्या याच सिनेमात पंकज त्रिपाठी याने तेव्हाच्या एका सुपरस्टारची भूमिका साकारली आहे. ‘लुडो’, ‘मिर्झापूर’, ‘लुकाछुपी’ अशा अनेक चित्रपटांतून पंकज त्रिपाठीची अभिनय क्षमता आपण जाणतोच.
आता ‘शकिला’ नावाच्या सिनेमातही अभिनयाचे नवे रंग तो दाखवेलच. आपल्या या सुपरस्टारच्या भूमिकेबद्दल तो म्हणतो, मला पडद्यावर का होईना कधीतरी सुपरस्टारची भूमिका करायचीच होती. ते माझं स्वप्नच होतं. तशी भूमिका मी यात प्रथमच साकारली आहे, असेही तो सांगतो. पंकजचा हा सिनेमा येत्या ख्रिसमस दरम्यान भारतभर प्रदर्शित होणार आहे.