प्रसिद्ध पार्श्वगायक शाहिद मल्ल्या याचे नवीन गाणे लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. शाहिदने आतापर्यंत अनेक सुमधुर गीते गायली असून हिंदी बरोबरच पंजाबी गीते तो गातो. “सारी कसर दिल की तुझपे निकाल दूं ! मैं रात भर, तुझे प्यार दू…” असे या नव्या गीताचे बोल आहेत.
आगामी ‘पुणे टू गोवा’ हा चित्रपट अमोल भगत दिग्दर्शन करत असून या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली आहे. हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि अॅक्शन स्वरूपात असून तो लवकरच प्रदर्शित होईल. या गाण्याला सन्मित वाघमारे यांनी संगीत दिले आहे, तर रॉपर ब्रॉज याने ते लिहिले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये आदित्यराजे मराठे आणि प्रह्लाद रामभाऊ तावरे यांचा समावेश आहे.
वास्तविक हा चित्रपट खऱ्या आयुष्यात संघर्ष करणार्या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे, पण या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणार्या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे, असे कळते.