अॅस्ट्राजेनेका ऑक्सफोर्डने विकसीत केलेली कोरोनाची लस चाचणीत 60 ते 70 टक्के यशस्वी ठरली असली तरी ती प्रभावी असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटने केला आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राजेनेकासोबत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लस विकसीत करण्याचे काम करत आहे. चाचणीमध्ये लस 60 ते 70 टक्के यशस्वी ठरली असली तरी कोरोनाशी मुकाबला करण्यास ती प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे सिरमने म्हटले आहे.
या निष्कर्षांवरून लस सरासरी 70 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनमध्ये 3 हजार स्वंयसेवकांनी चाचणीत सहभाग नोंदवला होता. त्यांना पहिल्या टप्प्यात कमी डोस देण्यात येणार नव्हता. अॅस्ट्राजेनेकाने चूक मान्य केल्यानंतर चाचणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने सिरमने लस प्रभावी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हिंदुस्थानात होणाऱ्या चाचण्यांबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगत चाचण्या योग्य पद्धतीने सुरू असल्याचे म्हटले आहे. शभरात 17 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून महिन्याभरात त्यांचे निष्कर्ष येणार आहेत.
चाचणीमध्ये 60 टक्के किंवा त्याहून अधिक यशस्वी ठरणारी लस प्रभावी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र, चाचणीत पारदर्शकता असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अॅस्ट्राजेनेकाने चूक झाल्याचे सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे लस प्रभावी असल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे.
सौजन्य : दैनिक सामना