अभिनेता संतोष जुवेकर सोशल माध्यमांवर सक्रीय असतो. आपल्या नवनव्या प्रोजेक्ट्सबद्दल तो सतत चाहत्यांना त्यावर माहिती देत असतो. आताही लवकरच तो ‘हिडन’ या एका हिंदी वेबसिरीजमध्ये काम करणार आहे. यात तो पोलीस अधिकारी बनणार आहे. ‘स्ट्रगलर साला’ आणि ‘भोसले’ नंतर तो पुन्हा एकदा वेबमाध्यमात जादू पसरवण्यास सज्ज झाला आहे.
आपल्या नव्या वेबसिरीजबद्दल त्याने इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. या पोस्टसोबत त्याने आपला एक फोटोही शेयर केला आहे. या फोटोमध्ये त्याने ‘प्रदीप राजे सहायक पोलीस आयुक्त’ असे लिहिलेली नेमप्लेट हातात धरली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘लवकरच…. याच वर्षी… माझ्या सगळ्या हिरोंना म्हणजेच मुंबई पोलिसांना समर्पित…’ यावरून दिसते की, संतोष जुवेकर याच वर्षी स्ट्रीम होणाऱ्या ‘हिडन’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून तो काय कमाल करतो ते आता पाहायचे.