आपल्या जीवनात संघर्ष कुणाला चुकला आहे? तो प्रत्येकाच्याच वाट्याला येतो. पण या संघर्षालाही अनेक पैलू असतात. जीवनातील नेमक्या अशाच संघर्षाचे अनेक पैलू समोर आणणाऱ्या ‘पेन्शन’ या मराठी सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत चमकणार आहे. याशिवाय सुमीत गुट्टे हा बालकलाकारही तिच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
घरातील उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत पेन्शन असतो. अशावेळी या उत्पन्नाच्या मुळालाच धक्का लागायला सुरुवात होते तेव्हा काय घडते हे या सिनेमात दिसेल. इरॉस नाऊ या सिनेमाची निर्मिती केलेलीअसून त्याचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले आहे. हा सिनेमा येत्या २४ फेब्रुवारी रोजी इरॉस नाऊ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.