कॅनरा बँकेतर्फे नुकतेच सांताक्रुझ पूर्व येथील गाला ऑडिटोरियम येथे मेगा रिटेल एक्स्पो कॅम्पचे आयोजन केले होते. एक्स्पोमध्ये मुंबई आणि परिसरातील आघाडीचे बिल्डर्स आणि विकासक, ऑटोमोबाईल वितरक, आघाडीच्या शिक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर बँकेकडून दक्षिण मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर व ठाणे येथील सेलिब्रेशन बँक्वेट हॉल येथेही एक्स्पोचे एकाच दिवशी आयोजन करण्यात आले होते. आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पोमध्ये सुमारे 224 कोटी रुपयांच्या कर्जांचे वाटप करण्यात आले.
सौजन्य : दैनिक सामना