सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील एक आवडती जोडी आहे. ते क्युट कपलही आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये ते पहिल्यांदा एकत्र आले आणि मग जीवनातही ते एकत्रच झाले. ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातूनही ही जोडी प्रेक्षकांना भावली. या दोघांच्या जीवनात आता तिसरी आली आहे.
ही तिसरी म्हणजे दुसरी कुणी नसून त्यांची पहिली कार आहे. सुव्रतने नुकतीच याबाबतच माहिती इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी शेअर केली. या पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘कार असावी ही माझ्या आईची इच्छा होती. जी 25 वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असल्याने मला सहाजिकच पहिल्या कारबाबत अतोनात आनंद झाला आहे’ असे तो स्पष्ट करतो. सुव्रत सध्या ‘अमर फोटो स्टुडियो’च्या माध्यमातून तर सखी ‘बेफाम’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत.