‘सैराट’मुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला मिळालेली लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. ‘हंड्रेड’ या वेबसिरीजनंतर ती पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच दिसणार आहे. ती आता ‘अनपॉज’ या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये उंदराला घाबरणारी रिंकू दिसते आहे.
हा सिनेमा पाच लघुपट एकाच सिनेमात दाखवणार आहे. या पाचपैकी एका ‘रॅट ए टॅट’ या शॉर्ट फिल्ममध्ये रिंकू अभिनेत्री लिलेट दुबोसोबत झळकणार आहे. राज एंड डीके, निखिल आडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरु आणि नित्या महरातो यांनी हे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. ‘रॅट ए टॅट’चे दिग्दर्शन तनिष्ठा मुखर्जीने केलं आहे. हा सिनेमा १८ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. रिंकूचे चाहते तिची एक झलक पाहूनही खूष होतील हे नक्की.