झी फाईव्हवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘लाहोर कॉन्फडेन्शियल’ या रोमान्टीक स्पाय थ्रिलरचे ट्रेलर आल्यापासूनच लोकांमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा कधी येणार अशी विचारणा लोक इंटरनेटवर करायला लागले आहेत. एकाच सिनेमात रोमान्स, थ्रील, अॅक्शन, कविता आणि राष्ट्रभक्ती हे सर्व एकत्र दिसणार असल्यामुळे लोकांना उत्सुकता लागणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच देशैतील प्रसिद्ध क्राईम रायटर एस. हुसेन झैदी यांनी सोशल माध्यमांवर आज जाहीर केले की ‘लाहोर कॉन्फिडेन्शियल’ हा सिनेमा नव्या तारखेनुसार आता पुढच्या वर्षी फेब्रुवारीत प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हीच घोषणा लगेचच काही वेळाने झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मनेही केली. मात्र ही तारीख का बदलण्यात आली ते मात्र झैदी किंवा झी फाईव्ह या दोघांपैकी कुणीच स्पष्ट केलेले नाही.