काही नवोदित अभिनेत्यांना काहीतरी हटके भूमिका करण्यात रस असतो, पण काहीजणांना सध्या उपलब्ध असलेल्या कथा कादंबर्यांवरील भूमिका साकारण्यात मजा वाटते. अभिनेता प्रियांशू पेन्युली हा दुसर्या प्रकारातला आहे. लवकरच तो युद्धस्थितीवर बेतलेल्या ‘दी बर्निंग चेफिस’ या पुस्तकावरील रिमेकमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्सन राजा कृष्णा मेनन करणार असून यात प्रियांशूसोबत मृणाल ठाकूर आणि इशान खट्टर यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. आपली भूमिका दमदार व्हावी यासाठी प्रियांशूने ‘दी बर्निंग चेफिस’ हे पुस्तक आणून ते वाचायला सुरुवात केली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ साली झालेल्या युद्धाच्या काळातल्या कथानकावर हा एक युद्ध ड्रामा आहे. यात ४५व्या कॅलवरी टँक स्क्वाड्रनचे ब्रिगेडियर बलरामसिंह मेहता यांचे जीवनकार्य दाखवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या भावाबहिणींसोबत या युद्धात मोलाची कामगिरी बजावली होती. याबाबत बोलताना प्रियांशू म्हणतो, आत्ता मी ही कादंबरी वाचायला सुरुवात केली आहे. पण यातला एकेक शब्द वाचकाच्या बुद्धीवर प्रखर प्रभाव टाकल्यावाचून राहात नाही. सिनेमाच्या पडद्यावरही हे कथानक पाहायला थरार येईल हे नक्की, असेही तो सांगतो. लवकरच या कथानकावर त्यांचे वर्कशॉप सुरू होईल, पण तोपर्यंत कथा वाचून घेऊया असेही तो पुढे स्पष्ट करतो.