• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पुणे – मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलले, काढले 74 हजार रुपये

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 10, 2021
in घडामोडी
0
पुणे – मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलले, काढले 74 हजार रुपये

एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्याने एटीएम कार्ड बदली करून 74 हजार रूपये काढून घेतले आहेत. टिंबर मार्केट परिसरातील एटीएम सेंटरमध्ये घटना घडली आहे. याप्रकरणी जयपालराम रामदेवजी काला (रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारदार रामदेवजी 20 जानेवारीला टिंबर मार्केट येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण, पैसे निघाले नाही. त्यांच्या पाठीमागे असलेल्या चोरट्याने त्यांना पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेत पीन क्रमांक विचारून घेतला. तो पीन क्रमांक टाकला. पण, पैसे निघाले नाहीत. त्याने एटीएम कार्ड काढून त्यांचे कार्ड ऐवजी दुसरेच त्यांना एटीएम कार्ड दिले. तक्रारदार यांनी एटीएम कार्ड घेऊन निघून गेले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून 74 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर रामदेवजी यांना खात्यातून पैसे काढल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम सेंटर चोरट्यांच्या रडारवर

एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मदतीच्या बहाण्याने चोरट्यांकडून एटीएम कार्ड बदली केले जाते. त्यानंतर पैसे काढले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसलेल्या ठिकाणीच थांबून चोरटे असे गुन्हे करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी मदत घेताना काळजी घ्यावी. तसेच, पीन क्रमांक कोणालाही सांगू नये, असे अवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

कोरोनाबाधित शिक्षकांना विशेष रजा मंजूर करा, राज्य शिक्षक सेनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Next Post

इंजीनियर शिवांगी खेडकर छोट्या पडद्यावर

Next Post
इंजीनियर शिवांगी खेडकर छोट्या पडद्यावर

इंजीनियर शिवांगी खेडकर छोट्या पडद्यावर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.