कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता पुणे महापालिकेने पालिकेच्या आणि खासगी शाळा सोमवार पासून खुल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंदच राहणार आहेत. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालकांशी चर्चा करुन सद्यस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली. तसेच 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना