ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीला तेलंगणा पोलिसांनी कोरेगाव पार्कमधून अटक केली आहे. कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्याठिकाणाहून 100 हून अधिक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत. त्याशिवाय अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यात लाखो रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
हैदराबाद आणि तेलंगणामध्ये ऑनलाइन कर्ज देण्याच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कंपन्या पोलिसांच्या रडारवर आहेत. ऑनलाइन कर्ज देण्यासंदर्भातील प्रक्रिया पुण्यातील एका कॉल सेंटरमधून सुरू असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांची मदत घेत शनिवारी कॉल सेंटरवर छापा टाकला. या कारवाई 100 लॅपटॉप, कागदपत्रे सापडली आहेत. त्याशिवाय पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे.
सौजन्य- सामना