अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री शिवानी बावकर यांच्यातील रोमॅंटिक केमिस्ट्री प्रेक्षकांनी ‘खुळाच झालो गं’ आणि ‘चाहुल’ या गाण्यांमधून अनुभवली होती. हीच जोडी आता ‘बरसू दे’ या गाण्यासाठी एकत्र येणार आहे. अभिषेक तेलंग आणि सायली कांबळे यांनी हे गाणं गायलेले आहे. आता पुन्हा ही जोडी या गाण्यासाठी एकत्र आली आहे. यामध्ये नितीश आणि शिवानीचा रोमॅंटिक अंदाज दिसतो आहे. छोट्या पडद्यावरही ही जोडी आधीच लोकप्रिय आहे. त्यांची ती मालिका संपून कित्येक दिवस लोटले असले तरी प्रेक्षकांचं अज्या आणि शितलीवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. अज्या आणि शितलीच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी जीवापाड प्रेम केलं आहे. म्हणूनच त्यांचे चाहते या दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री पुन्हा एकदा नव्या गाण्यातून अनुभवायला नक्कीच उत्सुक असतील.