• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

संभाजी भिडेंच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतून नितीन चौघुलेंना हटविले

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 8, 2021
in घडामोडी
0
संभाजी भिडेंच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतून नितीन चौघुलेंना हटविले

राज्यभर विस्तारलेली व प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारी ‘शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान’ ही संघटना आता कार्यवाहपदावरील कार्यकर्त्याच्या निलंबन कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यवाह नितीन चौगुले यांना हटविल्याने संघटनेतील वाद समोर आला आहे.

शिव प्रतिष्ठान संघटनेची व्याप्ती मोठी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या संघटनेमध्ये वाद धुमसत होता. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन चौगुले हे शिव प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमात अग्रभागी होते. संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते परिचित होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याबद्दल अंतर्गत तक्रारी सुरू झाल्या होत्या. कारवाई करण्याची मागणी केली जात होती. यामुळे त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नितीन चौगुले यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमधून नेमक्या तक्रारी काय होत्या, याबद्दल संघटनेकडून फारसा खुलासा करण्यात आलेला नाही. तरीही या कारवाईबाबत चौगुले व त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एका बाजूला कारवाईचे समर्थन, तर दुसऱया बाजूला चौगुले यांच्या समर्थकांकडून कारवाई मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी गावभागात चौगुले यांच्या समर्थकांनी कारवाई मागे घ्यावी म्हणून भिडे यांना विनंती केली होती. भिडे यांनी कारवाईवर ठाम राहण्याची भूमिका घेतली. संघटनेच्या मोठय़ा पदाधिकाऱयांवर कारवाई झाल्यामुळे शिव प्रतिष्ठान चर्चेत आली आहे.

आजवर निष्ठsने, ताकदीने संघटनेसाठी 20 वर्षे काम केले. शर्जिल उस्मानी याच्याविरोधात आंदोलन केले म्हणून कारवाई झाली का, अशी शंका मला वाटत आहे. कारवाईचे स्पष्ट कारण दिलेले नाही, गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्याविरुद्ध संघटनेत कारस्थान सुरू आहे. याबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

– नितीन चौगुले

संभाजीराव भिडे गुरुजींनी ही कारवाई केली आहे. चौगुले यांच्याबद्दल दोन वर्षांपासून तक्रारी येत होत्या. त्यामुळे कारवाई झाली आहे. त्यांना संघटनेतून काढून टाकले आहे.

– रावसाहेब देसाई, अध्यक्ष, शिव प्रतिष्ठान.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

राज्यात आता उद्योजक घडविणारी विद्यापीठे; कौशल्य विद्यापीठांसाठी सरकारने मागवले प्रस्ताव

Next Post

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण, गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

Next Post
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण, गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण, गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.