‘गली गली मे शोर है अर्णब गोस्वामी चोर है’, ‘अटक करा अटक करा, अर्णब गोस्वामी याला अटक करा’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णब गोस्वामी याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
‘गली गली मे शोर है अर्णब गोस्वामी चोर है’, ‘अटक करा अटक करा, अर्णब गोस्वामी याला अटक करा’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णब गोस्वामी याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्या अर्णव गोस्वामी याच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्णब गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्या व्यक्तीचे नाव जाहीर करावे यासाठी आज त्याच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
दरम्यान, अर्णब गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली तर राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अर्णव गोस्वामी याला ही गोपनीय माहिती कुणी पुरवली याची माहिती उघड करावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली.
सौजन्य : दैनिक सामना