• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाडियादवालांचा ‘सयोनी’ १८ डिसेंबरला

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 11, 2020
in मनोरंजन
0
नाडियादवालांचा ‘सयोनी’ १८ डिसेंबरला

लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीपासून चर्चिला जाणारा ‘सयोनी’ हा चित्रपट आता १८ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमाचा ट्रेलर लाँच आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी मिका सिंह, विंदू दारासिंह, झायेद खान, निशांत मलकानी, निर्माते मोहम्मद मोरानी, लकी मोरानी वगैरे उपस्थित होते. याचवेळी हा सिनेमा १८ तारखेला प्रदर्शित होत असल्याचेही जाहीर करण्यात आले. या चित्रपटात तन्मय सिंह नावाचा नवोदित अभिनेता प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याची नायिका म्हणून मुस्कान सेठी हीदेखील नवोदित अभिनेत्री दिसेल. हा एक म्युझिकल एक्शन थ्रिलर चित्रपट असून हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास यावेळी निर्मात्यांनी व्यक्त केला. या सिनेमातील गाणी अरीजित सिंह, बी. प्राक यांनी गायलेली असून या वर्षातील हे अतिशय प्रसिद्ध गायक आहेत हे वेगळे सांगायला नको.

यावेळी बोलताना तन्मय सिंह म्हणाला, हा माझ्या पदार्पणाचा सिनेमा असल्यामुळे मला या सिनेमाच्या प्रदर्शित होण्याची उत्सुकता आहे. या सिनेमासाठी सर्व काही उत्तम दर्जाचे वापरण्यात आले आहे. त्यात संगीतही आलेच. प्रेक्षकांनाही म्हणूनच हा सिनेमा आवडेल असा मला विश्वास आहे, असेही त्याने स्पष्ट केले. लकी नाडियादवाला-मोरानी यांची ही निर्मिती असून नितीन गुप्ता व अभय सिंघाल यांनी या चित्रपटाला दिग्दर्शन दिलंय.

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

ध्वनी भानुशालीचा नवा अल्बम

Next Post
ध्वनी भानुशालीचा नवा अल्बम

ध्वनी भानुशालीचा नवा अल्बम

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.