निर्माते दिग्दर्शक अजय जायसवाल नुकतेच ‘मैं शराबी’ हे आणखी एक मधुर गीत घेऊन आले आहेत. सुफियाना अंदाजातील हे गाणे रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि हीट लिस्टमध्ये हे गाणे लवकरच टॉपवर दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मेन्डोलीन व हार्मोनियमचे मधुर स्वर आणि अर्थपूर्ण शब्दांसोबतच राजीव राजा आणि निझामी ब्रदर्स यांचा मनमोहक आवाज या गाण्याला खास बनवतो हे नक्की. या सुफियानी स्टाईलच्या गाण्याला संगीतकार डीजे शेजवूड यांनी मॉडर्न टच दिला आहे..
या नव्या गाण्याबद्दल बोलताना अजय जायसवाल म्हणतात, सुफी गाणी सध्या कुठेतरी हरवून गेली आहेत. ती फारशी दिसतच नाहीत. आताच्या काळात तरुणाईमध्ये या गाण्यांना कमर्शियल व्हॅल्यूच उरलेली नाही. पण निझामी ब्रदर्स यांनी हाच सुफियानी गायन प्रकार पुन्हा जागवला आहे. अपेक्षा म्युझिकच्या अल्बमच्या व्हिडीओमध्ये राजीव राजा आणि सुफी निझामी ब्रदर्स (फैजान हसन निझामी आणि झिशान हसन निझामी) दिसत आहेत. डीजे शेजवूड यांनी संगीत दिलेले हे गाणे फैजान हसन निझामी आणि नईम अन्सारी यांनी लिहिले आहे. या गाण्याबाबत संगीतकार डीजे शेजवूड म्हणाले, सुफी गाणी परत आणण्याची वेळ आता आली आहे. संगीतातील हा प्रकार मला स्वत:ला खूप आवडतो. म्हणूनच हे गाणे बनवताना खूप समाधान मिळाले.