मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता मुंबईसाठी दोन पालिका आयुक्त असणे गरजेचे आहे. शहर आणि उपनगरासाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. त्या प्रमाणे मुंबईसाठी दोन आयुक्त असावेत अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाकडेदेखील आपण मागणी केली असल्याची माहिती शेख यांनी शनिवारी दिली.