अॅण्ड टीव्हीवर लवकरच ‘मौका-ए-वारदात’ ही लक्षवेधक क्राईम मालिका सुरू होतेय. यात भोजपुरी चित्रपटांमधले सुपरस्टार मनोज तिवारी, रवी किशन आणि सपना चौधरी चमकणार आहेत. हे सगळे मिळून अकल्पनीय गुन्ह्यांमागील रहस्यांचा उलगडा करतील. रवीराज क्रिएशन्स, हेमंत प्रभु स्टुडिओज, एअॅण्डआय प्रॉडक्शन्स आणि स्पेसवॉकर फिल्म्स निर्मित ही मालिका ९ मार्च २०२१ पासून दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ वाजता दाखवली जाणार आहे.
या मालिकेत प्रेक्षकांची मने विचलीत करणारी रहस्यमय गुन्हेगारी प्रकरणे आणि त्यामागील दृष्टीकोन दाखवतानाच गुन्हेगारांनी वापरलेली गुन्हेपद्धतही दाखवली जाणार आहेत. यामुळे ‘वास्तव हे कल्पनेपेक्षाही विलक्षण असते’ हे प्रेक्षकांना पटेल, असा निर्मात्यांना विश्वास आहे. यातील प्रत्येक कथा प्रबळ साप्ताहिक एपिसोडने भरलेली असेल. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका एका महिलेची आहे, जी विलक्षण गुन्ह्यांमागील रहस्यांचा उलगडा करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल. वास्तविक घटनांमधून प्रेरित असलेल्या या रोमांचक व रहस्यमय गुन्हेगारी कथा प्रेक्षकांना नक्की आवडतील असाही निर्मात्यांचा दावा आहे.