• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 6, 2021
in घडामोडी
0
लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोणार सरोवर येथील वनपुटी व्ह्यू पॉइंटला भेट दिली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली. लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका विकास कोणत्या पद्धतीने करावा याचा विचार एकत्रितरीत्या करावा. या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे त्यामुळे या ठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी.

लोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर येतात. त्यामुळे त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आ. संजय गायकवाड, आ. राजेश एकडे आदी उपस्थित होते.

स्थानिकांच्या सहभागाने होणार लोणारचा विकास

लोणारसारखी स्थळे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या वैभवाचे जतन संवर्धन करून त्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. हा विकास करताना स्थानिक गावकर्यांचे प्रश्न समजावून घेऊ, त्यांची सोडवणूक करू व त्यांचा सहभागही या विकास प्रक्रियेत करुन घेऊन हा आराखडा राबविण्यात येईल. याच धर्तीवर ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’चा ही विकास करण्यात येईल, तेथेही आपण लवकरच भेट देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

राज्यपालांनी आता अंत पाहू नये, रखडलेल्या आमदार नियुक्त्यांवरून अजित पवार संतापले

Next Post

शालेय फी कमी करण्यासाठी तज्ञ अधिकाऱयांची समिती, शिक्षण विभाग हतबल

Next Post
नववी ते बारावीच्या राज्यातील 88 टक्के शाळा सुरू, विद्यार्थी उपस्थिती 15 लाखांवर

शालेय फी कमी करण्यासाठी तज्ञ अधिकाऱयांची समिती, शिक्षण विभाग हतबल

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.