मार्च 2020पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडेच वाढला. नगरही त्याला अपवाद नव्हते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना प्रशासनाने हाती घेतल्या होत्या. लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते व संचारबंदीही लागू करण्यात आली होती. मेडिकल दुकाने, भाजीविक्रेते, किराणा दुकानदार या अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक वगळता अन्य दुकाने व व्यावसायिकांना दुकाने उघडणे व बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या गेल्या होत्या. अशा काळात बाहेर फिरताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे होते, याशिवाय बाजारात वा अन्यत्र कोठेही गेल्यास दोन व्यक्तींमध्ये किमान 3 ते 4 फुटांचे अंतर (सोशल डिस्टन्स) राखणे, संचारबंदीच्या काळात बाहेर न फिरणे, बनावट पासद्वारे फिरणे, दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती, चार चाकीमध्ये तीनच व्यक्ती, दुकान वेळेआधी न उघडणे, वेळ संपली तरी सुरू न ठेवणे असे विविध नियम केले गेले होते. या नियमांचे उल्लंघन करणाऱया व्यक्ती, दुकानदार-व्यावसायिक, संस्थांशी संबंधितांवर मुंबई पोलीस ऍक्ट 188नुसार विविध पोलीस ठाण्यांतून गुन्हे दाखल करण्यात आले होते. दुचाकी व चारचाकी वाहनेही जप्त केली गेली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जिह्यात असे तब्बल 26 हजार 700 गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे 2019 वर्षाच्या तुलनेत 2020मध्ये जिह्यातील दाखल गुह्यांची संख्या तब्बल जवळपास चौपट झाली होती.
2019 साली जिह्यात 11 हजार 195 गुन्हा दाखल झाले होता. या तुलनेत 2020मध्ये तब्बल 43 हजार 797 दाखल झाले व त्यात कोरोना काळातील गुन्हेच 26 हजार 700वर आहेत. त्यामुळेही गुह्यांची संख्या मोठी दिसू लागली आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलीस प्रशासनाने स्वतंत्र कर्मचारी नेमून पहिल्या टप्प्यात कोरोना काळातील दाखल 26 हजार 700वर गुह्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व गुह्यांचे स्वतंत्र चार्जशीट करावे लागणार असल्याने त्याचे काम सुरू केले गेले आहे.
गुन्हे उघडकीला येण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असून, स्वतंत्र कर्मचाऱयांद्वारे कोरोना काळात गुन्हे दाखल झालेल्यांचा शोध सुरू केला गेला आहे. यापैकी काही परराज्यांतीलही व्यक्ती असल्याने त्यांचा शोध जिकरीचा झाला आहे. या गुह्यांचे चार्जशीट करण्याचे काम पोलीस प्रशासनाने प्राधान्यक्रमाने हाती घेतले आहे. दरम्यान, जिह्यात दाखल गुह्यांपैकी 69 टक्के गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 77 टक्के आहे.
प्रलंबित गुह्यांचे प्रमाण झाले कमी
वाजवी कारणाशिवाय उशिराने गुन्हे दाखल करणाऱया पोलीस ठाण्यांवर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिला होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, उशिराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आता हळूहळू कमी होऊ लागले आहे. पोलीस ठाण्यांतून आता गुन्हे दाबण्याचे प्रकार कमी झाले आहेत. ऑक्टोबरअखेर 245 गुन्हे उशिराने दाखल झाले होते, पण पोलीस अधीक्षकांच्या सक्त सूचनेचा परिणाम होऊन नोव्हेंबरअखेर ही संख्या 112वर आली व डिसेंबरअखेर 92वर आली आहे. याशिवाय, आता अदखलपात्र गुन्हेही कमी होण्याच्यादृष्टीने पोलीस अधीक्षक पाटील यांनी पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत.