सोशल मीडियात वादग्रस्त विधाने केल्यामुळे कायद्याच्या कचाटय़ात सापडलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईत दाखल असलेले तीन फौजदारी खटले हिमाचल प्रदेशच्या न्यायालयात वर्ग करा, अशी विनंती त्यांनी याचिकेतून केली आहे. मुंबईत आमच्या जिवाला धोका असल्याचे दोघींनी म्हटले आहे.
कंगनाचे ट्विट हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमधील वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरणारे आहे, असा दावा करीत वकील अली काशिफ खान देशमुख यांनी कंगनाविरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने ‘रिपब्लिक टीव्ही’वर आपल्याविरोधात बदनामीकारक टिप्पणी केली, असा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे. तसेच कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. कंगना व तिच्या बहिणीने सर्वेच्च न्यायालयात मंगळवारी याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणीची तारीख निश्चित केली नाही.
कर्नाटक हायकोर्टाचा कंगनाला मोठा झटका
कंगनाला मंगळकारी कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. शेतकरी आंदोलनाबाबत तिने केलेल्या कादग्रस्त ट्किटसंबंधित खटल्याला स्थगिती देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. कर्नाटकच्या कनिष्ठ न्यायालयाने कंगनाकर गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. हा गुन्हा रद्द करण्याची किनंती कंगनाच्या ककिलांनी केली. मात्र उच्च न्यायालयाने ही किनंती धुडकाकून लाकली.
सौजन्य : दैनिक सामना