देशातील अन्य मोबईल कंपन्यांच्या ग्राहकांत मोठी घट होत असताना मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ आणि सरकारी भारत संचार निगम लिमिटेडने मात्र वर्षभरात आपल्या मोबाईल ग्राहक संख्येत कोट्यावधींची वाढ करीत आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली आहे.
हिंदुस्थानी टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (ट्राय ) जाहीर केलेल्या वर्षभरातील ग्राहकसंख्येच्या आकडेवारीत रिलायन्स जिओने 2019 या वर्षात सुमारे 9 कोटी नव्या ग्राहकांची भर आपल्या ग्राहकसंख्येत टाकली आहे. तर बीएसएनएल या सरकारी कंपनीने वर्षात आपल्या मोबाईल ग्राहकांच्या यादीत 37 लाख 40 हजार नव्या ग्राहकांची भर टाकली आहे.
भारती एअर टेल,वोडाफोन आयडिया यांनी मात्र कोट्यावधींच्या संख्येत आपले मोबाईल ग्राहक गमावले असल्याचे ट्रायच्या आकडेवारीत उघड झाले आहे.
सौजन्य : दैनिक सामना