कोरोनावरील लस देशाच्या कानाकोपऱयात ही लस सुरक्षितरीत्या पोहोचावी यासाठी दंड थोपटले आहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडून लक्झेम्बर्गच्या एका कंपनीशी करार करण्यात येणार असून पंपनी गुजरात येथे कोरोना लसीचा ट्रान्सपोर्टेशन प्रकल्प राबविणार आहे. ही कंपनी देशाच्या कानाकोपऱयात लस पोहचविण्यासाठी -4 अंश सेल्सियस ते -20 अंश सेल्सियसपर्यंतचे रेफ्रिजरेटेड बॉक्स तयार करणार आहेत.
देशभरातील तीन संस्थांमध्ये सध्या कोरोना लसनिर्मितीचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या तिन्ही संस्थेला भेट देऊन लसनिर्मितीच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. मार्च 2021 पर्यंत लसीकरण केले जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोरोनाची लस देशभरात सर्वत्र योग्यरीत्या उपलब्ध व्हावी यासाठी पंतप्रधान कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.देशभरातील तीन संस्थांमध्ये सध्या कोरोना लसनिर्मितीचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या तिन्ही संस्थेला भेट देऊन लसनिर्मितीच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. मार्च 2021 पर्यंत लसीकरण केले जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोरोनाची लस देशभरात सर्वत्र योग्यरीत्या उपलब्ध व्हावी यासाठी पंतप्रधान कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी लक्झेम्बर्गचे पंतप्रधान झेवियर बेटल यांनी द्विपक्षीय शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस ट्रान्सपोर्टेशन प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. लक्झेम्बर्ग येथील बी. मेडिकल सिस्टम ही कंपनी हा प्रकल्प राबविणार असून त्यासाठी कंपनीच्या उच्च अधिकाऱयांचे एक पथक लवकरच हिंदुस्थानात भेट देणार असल्याचे कळते.
500 ते 600 रुपयांपर्यंत उपलब्ध होणार कोविशिल्ड
ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेली कोविशिल्ड लसीकडे उभ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पुण्याचे सिरम इन्स्टिय़टय़ूट ऑफ इंडिया ही लस तयार करत असून साधारणपणे 100 कोटी लस तयार केली जाणार आहे. ही लस साधारणपणे 500 ते 600 रुपयांपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता असून सरकारसाठी ही लस अर्ध्या किमतीत उपलब्ध केली जाणार असल्याचे कळते. आतापर्यंत आलेल्या चाचणी अहवालानुसार ही लस प्रभावकारी असल्याचे दिसून आले आहे.
ही कंपनी सौर ऊर्जेवर चालणारे रेफ्रिजरेटर, फ्रिजर आणि बॉक्स तयार करणार आहेत. ज्यात लस सुरक्षितरीत्या देशाच्या कानाकोपऱयात पोहचवणे सहज शक्या होणार आहे. या प्रकल्पासाठी साधारणपणे दोन वर्षे लागणार असल्याचे कळते, परंतु कंपनीतर्फे लक्झेम्बर्ग येथून रेफ्रिजरेटर बॉक्स आणून लस वाटपाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कंपनीने – 80 अंश सेल्सियसपर्यंतच्या तापमानात लस एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पोहचविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत मार्च 2021 पर्यंत कंपनी सोलार, रॉकेल आणि विजेवर चालणारे रेफ्रिजरेटेड हिंदुस्थानात पाठविणार आहे.
लवकरच होणार अंतिम निर्णय
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या प्रस्तावावर विशेष लक्ष ठेऊन असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रस्तावाला अंतिम स्वरुप देण्यासाठी युरोप युनियनमध्ये असलेले हिंदुस्थानाचे राजदूत संतोष झा यांनी कंपनीच्या उच्च अधिकाऱयांबरोबर चर्चा पूर्ण केली असल्याची माहिती हाती आली आहे. लवकरच याबाबत अंतिम घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
सौजन्य ; दैनिक सामना