• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्र लढला… लढतोय!

ag.bikkad by ag.bikkad
December 30, 2020
in गर्जा महाराष्ट्र
0
महाराष्ट्र लढला… लढतोय!

कोरोना काळ हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील न भूतो न भविष्यति असा कालखंड होता.
‘न्यू नॉर्मल लाईफस्टाईल’मध्ये आता आपण स्थिरावत आहोत. कोरोनाचा अनुभव कितीही भयावह असला, तरी त्यामुळे वैद्यकीय, सामाजिक व्यवस्थेमध्ये खूप सकारात्मक बदल घडले आहेत. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपला महाराष्ट्र लढला, लढतोय!
… खास ‘मार्मिक’च्या वाचकांसाठी सांगताहेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतील (आयसीएमआर) महामारी विज्ञान आणि साथरोग विभागाचे निवृत्त प्रमुख आणि कोरोना लढ्यादरम्यान ‘आयसीएमआर’चा चेहरा बनलेले मराठमोळे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर…

दिनांक ९ मार्च रोजी पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि महाराष्ट्रातून ब्रेकिंग न्यूज होऊ लागल्या. अर्थात, केवळ आरोप-प्रत्यारोपांचा खेळ आणि अशा ब्रेकिंग न्यूजच्या मागे धावून चालणार नाही. कोरोना संसर्गासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वंच बाबी पोषक होत्या, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच, केवळ संसर्गाच्या आकड्यांकडे पाहू नका. आपण आतापर्यंतची परिस्थिती अतिशय उत्तम प्रकारे हाताळली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने लढलो आहोत, लढतो आहोत.

संसर्गाचा फटका बसण्यासदृश पोषक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पुढील कारणांमुळे होती –

  1. लोकसंख्येची घनता – वाढत्या शहरीकरणामुळे महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता खूप आहे. अतिशय कमी जागेत सरासरीपेक्षा अधिक जनता वास्तव्य करीत आहे. त्यामुळेच, कोणताही संसर्ग पसरण्याची शक्यता बळावते.
  2. स्थलांतर – महाराष्ट्र ही शिक्षणापासून ते नोकरी-व्यवसायासाठी लाखो लोकांची कर्मभूमी बनली आहे. परदेशातून, देशातून आणि राज्यांतर्गत नागरिकांचे महाराष्ट्रात मोठ्या संख्येने स्थलांतर होते. परिणामी, संसर्गाचा फैलाव होण्यासाठीदेखील पोषक वातावरण निर्माण होते. या स्थलांतरामधून बाहेरील आजार आपल्याकडे सहजरीत्या डेरेदाखल होऊ शकतात.
  3. राज्यांतर्गत दळणवळण सुविधा – शिक्षण, नोकरी-व्यवसायामुळे स्थायिक झालेल्या जनतेचे शहर आणि राज्यांतर्गत खूप मोठ्या संख्येने दळणवळण आहे. त्यासाठी प्रवासाच्या आधुनिक व प्रभावी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच, संसर्गालादेखील पाय फुटण्यास मदत होते.

कोरोना संसर्गाचा फैलाव होण्यासाठी पोषक असे सर्व घटक असण्याच्या या पार्श्वभूमीवरसुद्धा आपल्याकडील कोरोना केसेसची संख्या जास्त आहे, हे मी मान्य करणार नाही. अशी परिस्थिती हाताळणे सोपे नाही. संसर्गाला एवढी पोषक परिस्थिती असताना आपण तो नियंत्रणात राखू शकलो, ही खूप मोठी गोष्ट आहे. सरकारबरोबरच लोकांनादेखील त्याचे श्रेय नक्कीच जाते. या दोन्ही घटकांनी एकमेकाला मोलाची साथ दिली. तसेच, आपल्याकडे साक्षरता अधिक आहे. धोक्यासंदर्भात लोकजागृती होण्यासाठी आपण प्रभावी पावले उचलली. परिणामी, समाजात जागरूकता आली आणि समाजातील सर्व घटकांनी एकमेकाला खूप सांभाळून घेत या महामारीचा मुकाबला केला.

 

संसर्गाच्या तीव्रतेचा आपल्याला प्रारंभी काहीच अंदाज नव्हता. दिवसागणित हा संसर्ग वाढत होता. पण, आपल्या सर्व क्षमतांचा आपण यथाशक्ती वापर करीत गेलो. अनुभवातून अनेक गोष्टी शिकल्या. त्या लगेच अमलातदेखील आणल्या. त्यामुळेच, संसर्गाला आळा घालण्यास मदत झाली.

महाराष्ट्रामध्ये जनतेला फसविणेही सोपी गोष्ट नाही. अनेक स्तरांवर दक्ष यंत्रणा आणि नागरी शक्ती आहेत. परिणामी, सरकार आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा स्तर खूप उंचावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार एखादी गोष्ट लपविते आहे, हे म्हणणे खूप कठीण आहे. या आपत्ती काळात सरकारनेदेखील पारदर्शक कारभार केला. विशेष म्हणजे पॅनिक न होता परिस्थिती खूप प्रभावी पद्धतीने हाताळली. सरकारच सैरभैर झाले, तर त्याचे विपरीत परिणाम प्रशासकीय यंत्रणा आणि समाजाच्या मनोधैर्यावर पडतात. महाराष्ट्रात तसे झाले नाही. तसेच, सरकारी व्यवस्थेवर खूप चांगला विश्वास प्रस्थापित झाला. कोरोना संसर्ग वाढण्याची जी भीती प्रारंभी व्यक्त करण्यात आली होती, तशा व्याप्तीने तो वाढला नाही.

महाराष्ट्राची तुलना आपण कॅलिफोर्नियाशी करतो. तेथील आकडेवारी पाहा. आपल्याकडील संसर्ग खूपच कमी आहे. तसेच, युरोपमधील कोणत्याही देशाचे उदाहरण घ्या. त्या देशांच्या तुलनेत आपल्याला एवढा खराब मार बसला नाही. आपण तो बसू दिला नाही, ही अतिशय उजवी बाब आहे.

धारावीमध्ये संसर्ग नियंत्रणात आणणे, ही खूप मोठी कामगिरी आहे. सरकार, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था या सर्वांनाच त्याचे श्रेय आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच समाजाच्या सर्वंच घटकांमधील कोरोना योद्ध्यांची कामगिरी आपण सर्वांनीच अनुभवली. ती अतिशय प्रेरणादायी आहे. ती आपल्या समाजाची दीर्घ काळासाठीची शक्ती ठरते आहे.

…अशी ठरतेय कोरोना इष्टापत्ती

कोरोना संसर्गाच्या माध्यमातून अनेकांनी खूपच दुःखद अनुभव घेतले आहेत. परंतु, त्याच वेळेस हा संसर्ग अनेकार्थाने इष्टापत्तीदेखील ठरत आहे. मुख्य म्हणजे, सर्वंच स्तरांवर आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची निर्मिती झाली. तसेच, त्यामध्ये किफायतशीर दरात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पेशंटच्या लुटालुटीच्या काही घटना घडल्या आहेत. पण, जागरूक प्रशासन-सरकार त्यांना आळा घालते आहे, तशी व्यवस्था-नियम अस्तित्वात नक्कीच येतील.

मॉलेक्युलर स्तरावरील प्रगत चाचण्या करण्याची क्षमता असलेल्या सुमारे ११०० प्रयोगशाळांचे जाळे देशभर आणि महाराष्ट्रातदेखील, अगदी जिल्हा स्तरापर्यंत विणले गेले. यापुढील काळात त्याच्या माध्यमातून बाकीचे संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्यविषयक निदान करणे शक्य होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञांची फौज निर्माण झाली आहे. वैद्यकीय उत्पादनांच्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेला चालना मिळाली. त्याने आपल्या वैद्यकीय व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.

सर्वसामान्य जनतेमध्ये आरोग्यविषयक जाणिवा आता बळकट झाल्या आहेत. सरकारी आणि खासगी स्तरावरील आरोग्य यंत्रणेमध्ये सर्वार्थाने खूप मोठी दरी होती. ती कमी करून आरोग्य व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करण्यात आपण खूपच यशस्वी ठरतो आहोत.

तसेच, या दोन्ही व्यवस्था आपापल्या शक्तिस्थानांचा वापर करीत एकमेकांना पूरक अशा पद्धतीने कार्यरत कशा राहू शकतील, याची जाणीव आपल्याला झाली. याच कार्यप्रणालीवर आता यापुढील काळात वैद्यकीय सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था यांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील समन्वय अधोरेखित झाला. तसेच, त्याचा प्रभावी उपयोग कसा करता येईल, याचे अतिशय स्थानिक स्तरावरील मॉडेल अस्तित्वात आले. एकूणातच सर्वच आरोग्य व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मकदृष्ट्या बदलला आहे. आरोग्य व्यवस्थेचे अपग्रेडेशन झाले आहे. या यंत्रणेवर यापुढील काळात धूळ नक्कीच बसणार नाही. किंवा त्या पांढरा हत्तीदेखील होऊन बसणार नाहीत. अर्थात, त्याची खातरजमा करणे ही आपली जबाबदारी ठरणार आहे.

कोरोना युद्धातील या वैद्यकीय-सामाजिक कामगिरीच्या जोरावर आता यापुढील काळातदेखील अशीच प्रभावी तटबंदी अबाधित राखणे अतिशय गरजेचे आहे. आपल्याकडे औद्योगिक, शहरीकरणाबरोबरच संसर्गपोषक परिस्थिती वाढतच जाणार आहे. म्हणूनच, आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरण, पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आता भर देणे गरजेचे आहे. संसर्गमुक्त इमारती, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी उद्योगांपासून नागरी वसाहतींपर्यंत मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. जेणेकरून कोणत्याही संसर्गजन्य आजारांची बाधा होण्याची शक्यता कमीत कमी राहील. महाराष्ट्र हे नक्कीच करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे क्षमता आणि सिद्धता आहे. हे आपण कोरोना काळातील कामगिरीमुळे सिद्धदेखील केले आहे. आपली कामगिरी नक्कीच चांगली राहिली आहे. त्याबाबत वादच नाही. आरोग्यदायी व्यवस्था आणि वैद्यकीय सिद्धतेच्या आलेखावर कोणत्याही प्रगत राष्ट्राच्या पंक्तीत महाराष्ट्र विराजमान होऊ शकतो, हे नक्की.

(शब्दांकन – आशिष पेंडसे)

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ने जागविला आत्मविश्वास

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आत्मविश्वास जागविला आहे. अतिशय सोप्या भाषेत आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून ही संकल्पना समाजात रुजविण्यात आली आहे. कोणत्याही वैद्यकीय चळवळीचा दीर्घकाळ लाभ मिळवून देण्यासाठी समाजाचा सहभाग अतिशय निर्णायक ठरतो. त्यामध्ये समाजाला ज्ञान देणे आणि त्याचे सक्षमीकरण करणे गरजेचे ठरते. कोरोना लढ्यामध्ये आपल्याला धोक्याबाबत खूप कमी माहिती होती. तसेच, त्याचा मुकाबला करण्यासाठी तशी कोणती साधनसामग्रीदेखील नव्हती. अशा परिस्थितीत मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे, अशा अतिशय मूलभूत माहितीची ढाल करून माझे कुटुंब योजनेच्या माध्यमातून आपण लढा उभा केला.

समाजाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे असते. एखादी गोष्ट समाजाला करता येऊ शकते आणि ते तुम्ही करू शकता, हा आत्मविश्वास रुजविणे गरजेचे ठरते. आम्ही त्याला हेल्थ बिलिफ मॉडेल म्हणतो. या योजनेच्या माध्यमातून आपण त्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत.

 

या योजनेच्या माध्यमातून खूप प्रभावी आरोग्यसंवाद साधण्यात आला. आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये कुटुंबपद्धतीला अतिशय महत्व आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यात याच कुटुंबाचे एक युनिट करून त्याच्या माध्यमातून सामूहिक सामाजिक फौज राज्यात तैनात झाली. तिच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झाली.

युवा पिढीला सलाम!

कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये युवा पिढीने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. संपूर्ण जग लॉकडाऊन असताना, संसर्गाचा धोका आ वासून उभा ठाकला असताना वैद्यकीय क्षेत्रातील युवा पिढी झपाटल्यासारखी काम करीत होती. आपल्या जिवाचीदेखील त्यांनी पर्वा केली नाही. त्याचप्रमाणे विविध स्वयंसेवी संस्था, एनसीसी-एनएसएस आदींच्या माध्यमातून तरुणाईने अक्षरशः जिवाची बाजी लावली. त्यांच्यामुळेच, आज आपण कोरोनाच्या समोर निर्धाराने उभे ठाकलो आहोत. या युवा योद्ध्यांमुळेच, भविष्यात आता कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची जबरदस्त क्षमता-आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. आपल्या राज्याचे ते मोठे बलस्थान ठरणार आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने त्रिवार सलाम!

 

आता यापुढे काय करायला हवे…

कोरोनाच्या निमित्ताने राज्यभरात प्रभावी आरोग्यसंवाद प्रस्थापित झाला आहे. सरकारी ते खासगी रुग्णालये, निमवैद्यकीय आरोग्यसंस्था अशा सर्वंच स्तरांवर आरोग्यविषयक जनजागृती निर्माण झाली आहे. यापुढील काळात ही आरोग्यसंवाद मोहीम कायम ठेवून समाजाचा सहभाग कायम ठेवावा. केवळ औपचारिक अभ्यासक्रमाचा भाग न ठेवता दैनंदिन आयुष्याचा भाग असावा.

सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून शहरांपासून अगदी तालुका-गाव स्तरावर वैद्यकीय सुविधा पोचविण्याची यंत्रणा सशक्त झाली आहे. तिच्या माध्यमातून सार्वत्रिक आणि निरंतर आरोग्य व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी शाश्वत यंत्रणा निर्माण करावी. त्यामध्ये सरकारबरोबरच समाजातील सर्व घटकांचा सहभाग कायम ठेवणे गरजेचे.

कोरोना कालावधीमधील कार्यप्रणालीचे चांगले डॉक्युमेंटेशन करणे गरजेचे आहे. कोणत्याही सामाजिक संसर्ग-साथरोगाच्या वेळेस नेमके काय करणे गरजेचे आहे, याच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिम (एसओपी) आता आपल्याकडे तयार झाल्या आहेत. त्यामध्ये समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग राहिला आहे. त्याचे शास्त्रीय डॉक्युमेंटेशन करून ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे, यापुढील अशा कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठीची पूर्वतयारी करणे शक्य होईल.

सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करणे किती आवश्यक आहे, याचे महत्व अधोरेखित झाले. तसेच, शासकीय व्यवस्थेमध्ये सोशल मीडियाचा किती प्रभावी वापर करता येतो, याचाही आपल्याला प्रत्यय आला. कम्युनिटी कम्युनिकेशन (सामाजिक संवाद) या माध्यमातून प्रभावी पद्धतीने केला जाऊ शकतो. आपत्ती परिस्थितीचा मुकाबला करणे आणि निवारण करणे या प्रक्रियेचा तो एक आविभाज्य भाग करावा.

Previous Post

सिनेमागृहांचे तुटले ओटीटीचे फावले!

Next Post

Year Ender; ‘या’ आहेत 2020 मध्ये लॉन्च झालेल्या सर्वात स्वस्त कार

Related Posts

गर्जा महाराष्ट्र

महायुतीत कुणाचा जोर, कोण शिरजोर?

May 8, 2025
गर्जा महाराष्ट्र

महाराष्ट्रदिनाचा वज्रसंकल्प!

May 5, 2025
गर्जा महाराष्ट्र

भाजपाची कोटी-कोटीची उड्डाणे!

April 25, 2025
गर्जा महाराष्ट्र

‘फुले’ आणि काटे!

April 17, 2025
Next Post
Year Ender; ‘या’ आहेत 2020 मध्ये लॉन्च झालेल्या सर्वात स्वस्त कार

Year Ender; ‘या’ आहेत 2020 मध्ये लॉन्च झालेल्या सर्वात स्वस्त कार

रवींद्र जाडेजाचा पराक्रम; धोनी, विराटनंतर अशी कामगिरी करणारा फक्त तिसरा खेळाडू

रवींद्र जाडेजाचा पराक्रम; धोनी, विराटनंतर अशी कामगिरी करणारा फक्त तिसरा खेळाडू

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.