विद्यार्थिनींना ‘गुड टच, बॅड टच’ ओळखून आपला बचाव कसा करावा याचे ऑनलाईन धडे दिंडोशीतील विद्यार्थिनींना शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आले. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिंडोशी विभागातील तब्बल 315 विद्यार्थिनी आपल्या पालकांसोबत या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी झाले.
सध्याच्या युगात शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी तयार करून सक्षम बनवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये शरीरस्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दिंडोशीत विविध क्रीडा उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या मोहिमेत ‘गुड टच आणि बॅड टच’ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे युवा सेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तज्ञांच्या माध्यमातून ऑनलाईन शिबिरात विद्यार्थिनींना ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ कसा ओळखावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात जिजामाता विद्या मंदिर, महाराणी सईबाई विद्या मंदिर, शिवाजी विद्या मंदिर, गुरूपुल विद्यालय, हरणाई विद्यालय आदी शाळांमधील 315 विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसोबत सहभाग घेतला.
‘बॅड टच’ला विरोध करा, तक्रार करा!
विद्यार्थिनींना पुणी बॅड टच करीत असेल तरी तो कसा ओळखावा याबाबत या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. हा वाईट स्पर्श, गैरवर्तन ओळखून घाबरून न जाता त्याची तक्रार आपले शिक्षक, पुटुंबीयांकडे करावी. समोरच्याने पुणालाही सांगू नको अशी धमकी दिली तरी त्याची तक्रार करावी, बॅड टचला घाबरून न जाता विरोध करावा असेही मुलींना समजावण्यात आले.
सौजन्य- सामना