विमान आकाशात उडत असताना अचानक वरखाली व्हायला लागलं, हादरायला लागलं, प्रवासी चिंतित झाले, देवाचा धावा करू लागले…
वैमानिकाने उद्घोषणा केली, प्रवासीजनहो, तुमच्यासाठी दोन बातम्या आहेत… एक चांगली, एक वाईट. कोणती सांगू?
प्रवासी म्हणाले, आधी वाईट बातमी सांगा.
वैमानिक म्हणाला, विमानात एक मोठा तांत्रिक बिघाड झाला असून सगळ्या दिशादर्शक यंत्रणा बंद पडल्या आहेत… आपण नेमके कुठे चाललो आहोत, वर चाललो आहोत की जमिनीच्या दिशेने झेपावतो आहोत, ते कळण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत…
प्रवासी म्हणाले, अरे देवा, अशा परिस्थितीत चांगली बातमी काय असू शकेल?
वैमानिक म्हणाला, चांगली बातमी अशी आहे विमानाचा वेग अजिबात कमी झालेला नाही, तो एकदम परफेक्ट आहे.