रत्न आणि दागिने उद्योगातील धाडसी आणि हुशार महिला उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी प्रथमच ‘गोल्डन गर्ल्स पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘दी बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनने निष्ठाश्री श्रीनिवासन, राखी बिस्वास देब, अबीरामी संतोष, वंदना सराफ, पियुषा न्याती, मोना शहा, डॉ. रीनिषा चनानी, अंबिका बर्मन, ऐश्वर्या गुप्ता, प्रीता अग्रवाल आणि पूजा मेहता यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आयबीजेएचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. चेतन मेहता, राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता, वामन हरी पेठेचे आशिष पेठे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बजाज आणि नीरज गाबा यांनी केले. आयबीजेएचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी म्हणाले, भारतीय महिला कुटुंबकेंद्रीत आणि कामासाठी समर्पित आहेत. जीजीए पुरस्कार भारतातील प्रतिभावान महिलांना समर्पित आहे, ज्यांना आत्मनिर्भर भारताच्या भावनेने प्रेरीत पंतप्रधान मोदी यांचे व्हिजन आहे. सक्षम करण्याची शक्ती आणि क्षमता आहे.
– संदेश कामेरकर