घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये तब्बल 50 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे महागाईचा भडका आणखी वाढणार आहे.
5 किलोच्या गॅस किंमतीत 18 रुपयांनी वाढ केली आहे. 14.2 किलो गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये जादा मोजावे लागतील, तर 19 किलो गॅससाठी 36.50 रुपये वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे 14.2 किलो गॅस सिलिंडरसाठी मुंबईत 644 रुपये, कोलकाता येथे 670.50 रुपये, चेन्नईत 660 रुपये आता द्यावे लागतील. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडवर सरकारकडून ग्राहकांना सबसिडी दिली जाते; पण कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या केंद्र सरकारकडून पाच महिन्यांपासून सबसिडी दिली जात नाही.