अक्षयकुमारच्या ‘फिलहाल-2 मोहब्बत’ या म्युझिक व्हिडीओचा टीजर रिलीज झाला आणि त्याने काही तासांतच डिजीटल विश्वात धमाका केला आहे. मुळात या व्हिडीओचा पहिला भाग 2019 साली रिलीज झाला होता. तेव्हाही त्याने बरेच मोठमोठे रेकॉर्ड बनवले होते. यूट्युबवर तेव्हापासून आतापर्यंत ते गाणे तब्बल एक अब्जवेळा पाहिले गेल्याची नोंद झाली आहे. आता नुकतीच या गाण्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून आली होती. त्यामुळे ‘फिलहाल-2 मोहब्बत’ या गाण्याच्या टीजरवर प्रेक्षकांनी धाडच घातली. कालच 30 जूनला या गाण्याचा टीजर निर्मात्यांनी दुपारी 2 वाजता प्रदर्शित केला. त्यानंतर काहीच तासांत हे गाणे एक लाख 10 हजार वेळा पाहिले गेले आहे. त्यावर 60 हजारांहून जास्त कमेंट्सही सकारात्मक असेच पडले आहेत. आज हे गाणे नंबर एकचे ट्रेण्ड होत असल्याचे यूट्युबनेही म्हटले आहे. हे गाणे 6 जुलैला रिलीज होणार आहे.