वृत्त लघुपटात भरपूर माहिती असते. त्यामुळे बुद्धी तीव्र व्हायला ते उपयुक्त ठरतात. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा वृत्त लघुपट ‘वुमन ऑफ माय बिलीयन’ लवकरच म्हणजे 12 ऑगस्टला मेलबर्न येथे सुरू होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. याच सिनेमाच्या प्रदर्शनानेच हा महोत्सव सुरू होणार आहे. यापूर्वी हाच चित्रपट लंडनमध्ये पार पडलेल्या भारतीय चित्रपट महोत्सवातही दाखवला गेला होता. मेलबर्न महोत्सव 12 ते 20 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अजितेम शर्मा यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सृष्टी बख्शी नावाच्या एका अशा स्त्रीची वास्तविक कहाणी दाखवण्यात आलीये, जिने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा 4 हजार किलोमीटरचा प्रवास 240 दिवसांत पायी केला होता. या प्रवासात तिला अनेक स्त्रियांचे अनुभव ऐकायला मिळाले होते.