गायीचे किंवा म्हशीचे दूध बाजारातून आणले की लगेच ते उघडून पित असाल तर जरा सावधान…! अशा कच्चा दुधाचे सेवन स्वास्थ्यासाठी हानीकारक होऊ शकते. उकळून न घेता तसेच ते प्यायल्यास अनेक विकारांना निमंत्रण देणारे ठरेल हे लक्षात घ्या. दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच सर्वांना देत असतात. कारण दुधात मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते. त्यामुळे हाडांना ते लाभदायक ठरते. पण दूध योग्य प्रकारे प्यायले तरच त्यांचा लाभ शरीराला मिळत असतो. चला तर पाहूया दूध योग्य प्रकारे प्यायचे म्हणजे कसे ते…
——————–
बॅक्टेरीयांचा समावेश
संशोधनानुसार असे समोर आले आहे की कच्च्या दुधामध्ये बॅक्टेरीया असण्याचा धोका जास्त असतो. कारण पाश्चराईज्ड दुधात पोषक तत्त्वे कमी असतात. कच्च्या दूध रुम टेम्परेचरवर ठेवल्याने विषाणूरोधी प्रतिरोध जीन आणि बॅक्टेरीयांचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरासाठी ते घातक ठरू शकते.
घातक बैक्टीरिया
संशोधकांनी म्हटले आहे की, कच्च्या दुधात घातक बॅक्टेरीया असतात. न्यूट्रल पीएच बॅलेन्स, मोठ्या प्रमाणावर पाणी आणि अन्य पोषक द्रव्यांमुळे कच्च्या दुधात बॅक्टेरीया वाढीस लागतात आणि ते जास्त काळपर्यंत जिवंत राहातात. यामुळेच कच्चे दूध लवकर खराब होते. म्हणूनच कच्चे दूध प्यायल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो. एका अहवालानुसार दरवर्षी किमान ३० लाख लोकांमध्ये अॅण्टीबायोटिक प्रतिरोधी संक्रमण मिळते. यामुळे कच्चे दूध पिऊ नये.
कोणते विकार होतात…?
• इन्फेक्शन होण्याचा धोका
• अन्न पचन होण्यात अडचण
• डायरिया
• डिहायड्रेशन
• आर्थरायटिस
• हिमोलिटिक युरिमिक सिंड्रोम
• उल्टी
• ताप
योग्य पद्धत काय आहे?
दूध पिण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे. दूध साधारण कोमट करून प्यायल्यावर पचनशक्तीवर काहीच वाईट परिणाम होत नाही. दिवसभरातून साधारण १५० ते २०० मि.ली. दूध प्यायलाच पाहिजे. वाटले तर या दुधात दालचिनी, बदाम, हळद आणि मध घालून ते मिश्रणही पिता येईल. यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होईल आणि कोणत्याही विकाराचा सामना तुम्ही नीट करू शकाल.