कोरोनाबाधित शिक्षकांना विशेष रजा मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात शाळेत ये-जा करताना तसेच स्थानिक प्रशासनाने कोरोनासंबंधी दिलेली जबाबदारी पार पाडताना अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांना कोरोनाची लागण झाली असून यादरम्यानच्या काळात शाळेत या शिक्षकांची बिनपगारी रजा लावण्यात आली आहे.
कोरोना संक्रमणात व संक्रमणानंतरच्या काळातही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांना मोठय़ा प्रमाणावर मानसिक त्रास झाला आहे. सदर काळात शिक्षक शाळेत अनुपस्थितीत राहिल्याने इतर खात्यातील कर्मचाऱ्य़ांप्रमाणे शिक्षकांनाही विशेष रजा देण्यात यावी, अशी मागणी अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.