• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुंबई, ठाण्यात कोरोनाला वेसण; केंद्रीय पथक समाधानी; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 9, 2021
in घडामोडी
0
कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे – मुख्‍यमंत्री

राज्यातील एकूण कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागात जास्त रुग्णसंख्या आहे. मात्र या भागातील नवीन रुग्णांची संख्या घटत असल्याबद्दल केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले आहे. विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिह्यात पॉझिटिव्हीटी दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षणही पथकाने नोंदविले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱयावर आहे. देशात असलेल्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णसंख्येपैकी केरळमध्ये 40 टक्के तर महाराष्ट्रात 24 टक्के रुग्ण आहेत. त्याबाबत आढावा घेण्यासाठी एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचे पथक शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱयावर आले. यावेळी त्यांनी मुंबईत सायन हॉस्पिटल तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर येथे भेटी दिल्या. त्यानंतर आज केंद्रीय पथकाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यामध्ये सहभागी झाले होते.

या पथकाने ज्या भागातील पॉझिटिव्हीटी दर जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे त्याची दखल घेऊन तेथील हा दर कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित करू. याभागातील रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी करण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. त्याचबरोबर ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील. असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्ट फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

नागपूर, भंडाऱयात सतर्कता
केंद्रीय पथकाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. नागपूर व अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती केंद्रीय पथकाने दिली त्यावर शहरी भागापेक्षा नंदूरबार आणि भंडारासारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही तरीही नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा अधिक सतर्क करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण वाढत आहे याची गांभीर्याने दखल घ्या!
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

 

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

कोरेगावात निवासी शाळेतील 31 विद्यार्थी कोरोनाग्रस्त

Next Post

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयात 100 मेगावॅट वीजनिर्मिती!

Next Post
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयात 100 मेगावॅट वीजनिर्मिती!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयात 100 मेगावॅट वीजनिर्मिती!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.