मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या सात तासांत कापणे समृद्धी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाने शक्य होणार आहे. या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शनिवार, 5 डिसेंबर 2020 रोजी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि संभाजीनगर जिह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.
मुख्यमंत्री या दौऱयादरम्यान सकाळी 10.20 वाजता नागपूर विमानतळावर पोहोचणार असून तिथून हेलिकॉप्टरमधून अमरावती जिह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर, मौजे देऊळगव्हाण येथे प्रयाण करणार आहेत. 11.15 वाजता ते येथील समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करतील. त्यानंतर 12.15 वाजता ते हेलिकॉप्टरने संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण करणार असून दुपारी 2 वाजता गोळवडी येथील समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
सौजन्य- सामना